सध्या लग्न सराई खूप जोरात चालू आहे. म्हणजे वाटत ही नाही की को’रो’ना काळ चालू आहे. सर्वसामान्य घरातली तर लग्न होतच आहेत; पण कलाकार यांचीही लग्न होत आहेत.
मराठी हिंदी आणि इतर बऱ्याच इंडस्ट्रीत लग्न या मागील काही काळात खूप झालेली आहेत. आणि आताही होत आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं काल आज लग्न विधी सुरू झालेला आहे. तर कार्तिकी गायकवाड यांचेही लग्न उरकलं आहे.
पण अश्यात मानसी नाईक या प्रसिद्ध अभिनेत्री नि ही वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. ज्यात काही गोष्टी घडल्या आणि त्या व्हायरल होत आहेत. आता तिच्या लग्नात अशी कोणती गोष्ट आहे जी व्हायरल होत आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
मानसी नाईकच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अखेर तो क्षण आला आणि रेशीमगाठीत अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह तिचं शुभमंगल नुकतंच पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
मानसीच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. मात्र या लग्नसोहळ्यामध्ये मानसीची खास मैत्रिण अभिनेत्री दिपाली सय्यदनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले. लग्न पार पडताच दिपालीला नववधू रुपात मानसीला पाहून अश्रु अनावर झाले होते. तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर ती खूप चर्चेत आली. कारण सर्वसामान्य कुणीही रडत बसलं तरी कुणालाच काहीच फरक पडणार नाही. पण दीपाली ही एक लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे.
तिने मानसी विषयी खूप मोठी पोस्ट लिहिली आहे. दिपाली सय्यदने इंस्टाग्रामवर मानसी नाईक सोबतचे फोटो शेअर करत लिहिले होते की, प्रिय मनू, आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास, तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही, आज संसारात वावरताना, मैत्रीण, आई, मुलगी, बहिण अशा कित्येक नात्यात वावरताना आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात एकमेकांच्या मागे, खंबीरपणे उभ राहून एकमेकांना साथ दिली…!
आपली मैत्री म्हणजे आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा ठेवा …मनू लवकरच तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे … मी तुम्हा दोघांनाही सुखी संसारासाठी शुभेच्छा देते. शेवटी एकच लिहावंसं वाटतं !!कायम आनंदी रहा मनू दिल्या घरी तू सुखी राहा.
मानसी नाईक च्या लग्नाच्या कारणामुळे दीपाली सयद ही अभिनेत्री ढसाढसा रडली. तरीही नंतर सोशल मीडियावर तिने शुभेच्छा ही दिल्या.