प्रेम म्हंटल की सगळ्यांना आठवत असेल आपलं पहिल प्रेम व ते मिळवण्यासाठी केलेली धडपड..तिच्या घराभोवती चकरा मारण, तिला चोरुन पाहणं, तीला शोधत राहणं…असं बरच काही अनेकांनी आपलं प्रेम मिळवण्यासाठी केलंय… असंच प्रेमाची आठवण करून देणारं एक नवं फ्रेश गाण मन मन हे प्रेक्षकांच्या नुकतंच भेटीला आलं आहे.

एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला शोधण्यासाठी वापरलेली युक्ती या गाण्यातून आपल्याला बघायला मिळनार आहे. याची निर्मिती केलीये अशोक घुले व रमेश आफळे यांनी तसेच या गीताचे संगीत संगीतकार व कवी प्रसाद गाढवे यांचे आहे … तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत असणारा महाराष्ट्राचा लाडका रोहित राऊत याने हे गाणं गायलंय तर या गाण्यातून योगेश तवार व प्राजक्ता घाग हि एक नवी फ्रेश अशी जोडी आपल्याला बघायला मिळनार आहे, गाण्याचं कथानक, दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका योगेश तवार यांनी पार पाडली आहे. गाण्याचं छायाचित्रण अक्षय वाघमोडे यांनी तर लाईटस अक्षय कडू यांनी केल्या असुन, प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल असा विश्वास यावेळी निर्मात्यांनी व्यक्त केला.