Lost & Found | Official Trailer | Siddharth Chandekar | Spruha…

Presenting the Official trailer of Lost and Found – Marathi Film.
अनोळखी लोकंच कधी कधी ओळखीची वाटतात. आणि खरंच कोणीतरी हवं असतं ना बोलायला…
#LostAndFound #film #comingsoon #29thJuly

Posted by Lost and Found – Marathi Film on Friday, July 1, 2016

गोल्डन गेट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाचं पोस्टर, संगीत आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालं. या चित्रपटातील पात्रांच्या ओळखीचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून सर्वांना या पात्राविषयी अजून जाणून घ्यायची इच्छा होती. कारण चित्रपटाचा विषय वेगळा असल्याची कल्पना प्रेक्षकांना टिझर मधून आली असावी आणि दुसरे कारण म्हणजे नवीन फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.

Lost and Found Music Launched

 

‘खरंच कुणीतरी हवं असतं ना बोलायला’ या चित्रपटाच्या टॅगलाईनमुळे प्रत्येकाला हा चित्रपट जवळचा वाटत आहे. प्रत्येक चित्रपटातील आकर्षक गोष्ट असते संगीत. नवीन चित्रपटातलं म्युझिक हे नेहमीच हवंहवंस वाटत असतं. नुकतंच ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

 

Lost and Found Trailer Music Launched

 

स्पृहा जोशी, सिध्दार्थ चांदेकर, मंगेश देसाई, डॉ. मोहन आगाशे यांचा अभिनय या चित्रपटात आहे. विनोद मालगेवर निर्मित आणि ऋतुराज धालगडे लिखित आणि दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

 

Lost and Found Official Poster

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here