मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण जाणतोच की आजवर तब्बल १४ पर्व होऊनही ज्याची लोकप्रियता तीळभरही कमी झालेली नाही, दर वेळेस तितक्याच उत्कंठेने रसिक प्रेक्षक ज्याची वाट पाहत असतात असा टीव्हीवरचा सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. आता लवकरच बिग बॉस शोचा १५ वा सिझन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या शोचे खास आकर्षण असते ते म्हणजे बॉलीवूडचा भाईजान दबंग सलमान खान. सलमान खान आणि बिग बॉस शो हे जणून समीकरणच बनले आहे. टीव्हीवरच नाही तर इथर प्लॅटफॉर्मवरही हा शो समलानमुळेच जास्त हिट ठरतो.  आता या बिग बॉस १५ चे  OTT प्लॅटफॉर्मवरील Voot वरही याचे प्रसारण होणार आहे.

डिजिटल प्रसारण होणाऱ्या या लोकप्रिय शो मध्ये यंदाच्या वर्षी हा एक मोठा बदल करण्यात आला आहे. बॉलिवूडचा डॅडी म्हणविला जाणारा, सुप्रसिद्ध निर्माता, निर्देशक करण जोहर यंदा बिग बॉस सिझन १५ हा शो VOOT वर होस्ट करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे सलमान खान हा टीव्हीवर होस्ट करताना दिसणार आहे. नुकताच ईदच्या शुभ मुहर्तावर या शोचा पहिला वहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. यात सलमान खान दिसत आहे.

त्यामुळे शोमध्ये बदल हा केवळ OTT प्लॅटफॉर्मसाठी करण्यात आला आहे. टीव्हीवर नव्या अंदाजात नव्या ढंगात, नव्या स्पर्धकांसह सलमान खान पुन्हा एकदा त्याच एनर्जीसह धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. तर हे सर्व सेलिब्रिटीं मिळून काय चटपटीत आणि मसालेदार मनोरंजन आपल्यासमोर सादर करणार आहेत? याची रसिक प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिलेली आहे.

‘बिग बॉस’ मधील प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी कठीण असतो. त्यात बिग बॉसच्या घरात काही मिळवायचं असेल तर स्पर्धकांना बराच घाम गाळावा लागतो. अगदी त्याच प्रमाणे करण जोहरालाही रसिकांची सलमानप्रमाणे पसंती मिळवायची असेल तर बराच घाम गाळावा लागणार असल्याचे दिसतंय. सुरुवातीपासून सलमाननेच हा शो होस्ट केला आहे.

पूर्वीच्या भागांमध्येही काही एपिसोडसाठी वेगेवेगळ्या अभिनेत्यांनी सलमानची जागा घेत शोला होस्ट केले होते. पण त्या भागांना हवी तितकी पसंती मिळाली नव्हती. त्यामुळे करण जोहर  OTT प्लॅटफॉर्मवर आता हा शो होस्ट करणार म्हटल्यावर रसिकांची कितपत पसंती मिळते हे पाहणे रंजक असणार आहे. पाहू काय होते ते…