मित्रांनो!, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन चेहरे आपणांस पहावयास मिळत असतात. कारण चित्रपटसृष्टीच्या या मायनगरीत अनेक युवक युवती आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. अनेकांना काम मिळून ते रसिक प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करून त्यांच्या मनांत मानाचे स्थान मिळवितात. अशीच एक नवोदित मराठमोळ्या अभिनेत्रीचा विवाह सोहोळा अगदी वाजत गाजत पार पडला.

मयुरी वाडेकर हे तिचे नांव. या लग्नाचे विशेष आकर्षण ठरले ते मयुरीचा डान्स. नववधूच्या साज शृंगारातच तिने लग्नं मंडपात एन्ट्री घेतली. नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडी मंडळी मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिली. विशेष म्हणजे तिच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

लोकप्रिय मराठी अभिनेते प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “डॉक्टर डॉक्टर” या विनोदी चित्रपटांतून मयुरी आपल्या समोर आली होती. याच्याही आधी ३५ % काठावर पास आणि वाजंत्री या काही मराठी चित्रपटांतून मयुरीने भूमिका केलेल्या आहेत. या शिवाय तिने काही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्येही भूमिका केल्यात जसे की, “चार दिवस सासूचे” आणि “गणपती बाप्पा मोरया” या त्या मालिका. या मालिकांमधील मयुरीच्या भूमिका रसिक प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.

मयुरी वाडेकरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच ९ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला. तिची जन्मतारीख ९ जुलै १९९७ आहे. तिचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या मुक्ता सैनिक स्कूल, अशोका हायस्कूल व व्हीएचजेसी कॉलेजमध्ये झाले. संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग झाले आहे.

या व्यतिरिक्त इतर उपक्रम म्हणाल तर, तिला घोडेस्वारी, पोहोणे, पर्वतारोहण कविता लेखन आणि विशेषतः चित्रकलेत तिने विशेष प्राविण्य मिळविले आहे. मध्यंतरी तिने तिचे विठूमाऊली हे चित्र सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. त्यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला होता.

मयुरी वाडेकर ही संपूर्ण शाकाहारी असून, ती कटाक्षाने शाकाहारी पदार्थांचे सेवन करते. तिचा आवडता पदार्थ आहे व्हेज चीज मोमोज हा आहे. तर मंडळी अशा या मराठमोळ्या नवोदित अभिनेत्रीचा विवाहसोहळा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने संतोष पोतदार नावाच्या युवकाशी वाजतगाजत पार पडला आहे. स्टार मराठीच्या टीम तर्फे नवविवाहितांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!!!