द कपिल शर्मा शो नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. त्यामुळेच, कदचित या मालिकेला अभूतपूर्व यश प्राप्त झालेलं आहे. दोन वेळेस बंद पडून देखील या शो ची लोकप्रियता कुठेही कमी होताना दिसत नाही. प्रेक्षक आज देखील या शो ला तेवढेच प्रेम देत आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला असतो. परंतु, या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा एक प्रकारे कपिल शर्मा हाच आहे.

त्याच्या टाईमींगमुळे हा शो प्रचंड प्रमाणात यश प्राप्त करत आहे. कपिल ला या कार्यक्रमात काम करण्यासाठी किती मानधन मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? आपण आजच्या लेखामध्ये या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात…

द कपिल शर्मा शो मधील कपिलची सहकलाकार अर्चना पुरणसिंग नेहमीच काहीतरी गौप्यस्फोट करत असते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देखील तिने असाच कपिल ला मिळणाऱ्या मानधनाबद्दल गौप्यस्फोट केला. हा आकडा ऐकल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित अजय देवगन आणि काजोल यांच्या देखील भुवया उंचावल्या गेल्या.

नुकताच प्रदर्शित झालेला ” तान्हाजी: द अनसंग वॉरियर ” चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वरती प्रचंड धुमाकूळ घालत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगन आणि त्याच्या टीमने द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे.

या कार्यक्रमात अजय ने कपिलची टर उडवण्याची एकदेखील संधी सोडली नाही. या कार्यक्रमात जेव्हा या दोघांची ही धमाल चालू होती तेव्हा अर्चनाने गौप्यस्फोट करत कार्यक्रम चालवण्यासाठी कपिल ला किती पैसे मिळतात याबद्दल खुलासा केला. खुलासा करताना अर्चना मस्करीत म्हणाली,” की कपिल ला या कार्यक्रमात काम करण्यासाठी इतका पैसा मिळतो की आमच्यासाठी खूपच कमी रक्कम शिल्लक राहते.”

अर्चना चे हे वाक्य ऐकल्यानंतर उपस्थितांना त्यांचे हसूच आवरले नाही. अर्चनाच्या या वाक्याला उत्तर देताना कपिल म्हणाला की, “आता मला देखील एक मुलगी आहे. घर चालवण्यासाठी मला पैसे कमवावे लागतात.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.