मराठी वेबसिरीज दुनियेत एक गाव तेरा भानगडी नावाची एक वेबसिरीज खूप लोकप्रिय झालेली आहे. त्यांचे कथानक हे प्रेक्षकांना खूप भावतं आहे. कारण साधेपणा, गाव गावातले किस्से यांमुळे काय होतंय की त्यांचा युट्युब वरील प्रेक्षक वर्ग हा दिवसेंदिवस खूपच वाढत आहे.

बरं वेबसिरीज जर सुपरहिट झाली म्हणजे त्यातले कलाकार हे भारी काम करत असतील. टीमचं काम दणका होत असेल म्हणूनच तर यशाचं शिखर ते गाठू शकले असतील. तर त्यामधील सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले एक पात्र आहे ते म्हणजे चतुर. होय ! आलं ना आता लक्षात. मूर्ती लहान पण कीर्ती आणि अभिनय खूप महान, उत्तम असा हा चतुर. महाराष्ट्र भर लोकप्रिय आहे.

तर त्याने नुकतंच आयुष्याची वैवाहिक सुरुवातीला केलेली आहे. त्याचे लाईव्ह खास लग्नमंडपासून ते गळ्यात माळा टाकेपर्यंत लाईव्ह व्हिडीओ आहे. जो चतुर आणि वेबसिरीज च्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सध्या सोशल मीडिया वे तुफान व्हायरल झालेला आहे व्हिडीओ.

बाळासाहेब सुनील पाटील हे चतुर यांचे खऱ्या आयुष्यातलं संपूर्ण नाव. चतुर हे एक उच्च शिक्षित आहेत. त्यांनी Mcom केलेलं आहे. आज जरी वेबसिरीज मध्ये आपल्याला असे दिसून येत असेल की ते काही नाही सिरीज मध्ये काम करताय. पण हेही विसरता कामा नये की ते उच्च पदव्युत्तर आहेत कॉमर्स मध्ये.

तर त्यांनी या कोरोना काळातल्या परिस्थितीत कमी लोकांमध्ये वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्न म्हणजे आनंदाचा, नव्या आयुष्याची सुरुवात असते. जीच चतुर यांनी केलेली आहे. ज्याचं अक्षरशः केलेलं सगळं लाईव्ह सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण चतुर चे लाखो फॅन आहेत. युट्युब इंडस्ट्रीत.

चतुर ला सगळीकडून म्हणजे चाहत्यांकडून आनंदाच्या शुभेच्छा येत आहेत. त्याच्या प्रेक्षकांना / चाहत्याना खूप आनंद झालेला आहे. तर आपण ही चतुर च्या आनंदात सामील होऊन एक नवी सुरुवात करण्यासाठी शुभ आशीर्वाद देऊयात. बाळासाहेब पाटील उर्फ चतुर याना पुढील भविष्यात ल्या यशस्वी वैवाहिक वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.