नागराज मुंजळे यांचा ‘सैराट’ तुफान घौडदौड करत आहे. मराठी सिनेमा जगतात एक विक्रम झालाय. ११ दिवसात ४१ कोटींची कमाई करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी आर्ची आणि परशा यांचा बोलबाला आहे. आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने सिनेमात काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिच्या यशातून दिसत आहे.
रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु ही सोलापूरमधील अकलूज या गावची मुलगी. तिची साधी राहणी. हाच साधेपणा नागराज मंजुळे यांना भावला. त्यांनी पक्के केले हिलाच घेऊन सिनेमा करायचा. बरोबर एक वर्षानंतर तिला कॉल केला. तिला पुण्यात बोलविण्यात आले. मात्र, अभिनयाचा गंध नव्हता. ग्रामीण भागात राहणारी निरागस मुलगी. मात्र, याच मुलीने कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनयाचा ठस्सा उमटवला.