तुम्हाला हे माहित झाल्यावर कदाचित आश्चर्य वाटेल परंतु अनुपमा या हिंदी मालिकेत काव्या या पात्राची भुमिका निभावणारी अभिनेत्री इतर कोणी नसून चक्क मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याची सून आहे. तिचं नाव मदालसा शर्मा हे आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असल्याची पहायला मिळते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांना नेहमी काही ना काही गोष्टी शेअर करत असल्याची पहायला मिळते.
अनुपमा मालिकेच्या सेटवर मदालसा हिने प्रचंड प्रमाणात स्वत:च फोटोशुट करवून घेतलं आहे. आणि याच फोटोशुटचे ती अनेकदा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिने सध्याच्या घडीला एक जो भन्नाट फोटो शेअर केला आहे, त्यामधे तिचं निखळ सौंदर्य अगदी बहरून आलेलं पहायला मिळतं आहे.
कानात अगदी मोठ्या आकाराचे कोरीव झुमके, ओठांवर लिपस्टीकची लाली, डोळ्यांभोवती अगदी नजर हेरून घेईल असं काजळ लावलेलं आणि एकूणच पारंपारिक साडीच्या वेशभूषेत ती अगदी कमाल दिसते आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी अगदी फिदा आणि घायाळ झाले आहेत. सध्या टिव्ही मेकर्सच्या अंदाजानुसार पुढील भागात काव्याची भुमिका फार रंजतदार ठरणार आहे. आणि याच भागात बराचसा फोकस तिच्यावर केला जाणार आहे.
मदालसा शर्माच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या विविध फोटोंवर चाहत्यांच्या तिच्या सौंदर्याची प्रशंसा करणाऱ्या अनेक कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचा सतत पहायला मिळतो. “काव्या झावेरी” या पात्राची भुमिका मदालसा शर्मा सध्याच्या घडीला निभावत आहे. अनुपमा ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत फारच सुंदर व टॉपची मालिका ठरलेली वारंवार पहायला मिळते आहे.
मदालसा चं जे पात्र आहे ते या मालिकेतल्या वनराज याच्या प्रेमिकेसोबतच त्याच्या कामातली त्याची सहचारिका असं आहे. वनराज याच लग्न झालं असूनदेखील त्यानंतर त्याच घराबाहेर दुसरं प्रेमप्रकरण असल्याची ही गोष्ट सध्या मालिकेत सुरू आहे. ही मालिका मुळात बंगालची असून याच मालिकेची मराठीत “आई कुठे काय करते?” या नावाने प्रोजेक्ट सुरू आहे. मदालसा हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिला ही भुमिका करायला मिळाल्याने ती फार आनंदी आहे.
ती म्हणते, एखाद्या चांगल्या बॅनरसोबत काम करणं ही खरचं गौरवाची बाब असते. शिवाय खरतरं जन्मापासूनच घरात एॅक्टींगचंच वारंवार वातावरण मिळालं असल्याने तिने सतत सिनेसृष्टीतच काम करण्याचा विचार आधीपासून केला होता. मदालसा ही प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा व प्रसिद्ध निर्माते सुभाष शर्मा यांची मुलगी आहे.
२०१८ सालात मिथुन चक्रवर्ती यांच्या मोठ्या मुलासोबत तिचं लग्न झालं. मदालसाने खरतरं याआधी सिनेसृष्टीत काम केलेलं आहे. तिने २००९ सालात तेलुगू सिनेसृष्टीतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर कन्नड सिनेसृष्टीतही तिने आपल्या कामाची छाप उमटवली होती. मदालसाने अनेकदा तिचे सासरे असलेल्या अर्थात मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. मिथुनचा स्वभाव हा दयाळू आणि फार विनम्र आहे असं ती वारंवार म्हणते.
शिवाय तिच्या नवऱ्याबद्दल अर्थात मिमोह चक्रवर्ती याच्याबद्दलही ती अनेक गोष्टी सांगत असते. तो तिची पुरेपूर काळजी घेत असतो. पण काही झालं तरी अनुपमा मालिकेतील एक चांगली भुमिका बजावणारी अभिनेत्री मिथुन चक्रवर्तींची सून आहे हे सुरूवातीला जरा आश्चर्यकारकचं वाटतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!