खरतरं तसं पहायला गेलं तर “तारक मेहता का उलटा चश्मा” ही मालिका लोकांची प्रचंड आवडती मालिका आजवर ठरत आलेली आहे. साहजिकचं त्यातील विनोदात्मक प्रसंग, संवाद, कलाकारांचे हावभाव जगाला जणू त्यांच्या विनोदात वेड व्हायला भाग पाडतं. या मालिकेला आजतागायत सुरू होऊन तब्बल १० पेक्षा अधिक वर्षे होत आहेत. या मालिकेच्या पहिल्या भागाची सुरुवात ही 28 जुलै 2008 रोजी झाली. आणि त्यानंतर या मालिकेने एकेक टप्प्यात आपल्या भरगच्च यशाचा विक्रमी पाया रचण्याकडे वाटचाल सुरू केली.

हळूहळू दिवसेंदिवस ही मालिका लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत गेली. या मालिकेतील सर्व पात्रे अगदी जणू परिपक्व असावेत असाचं भास वारंवार होत राहतो. अर्थातचं त्याच कारण म्हणजे प्रत्येक कलाकाराने त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांची पात्रता सिद्ध करून दाखवली. खरतरं तारक मेहता का उलटा चश्मा हा कार्यक्रम आजवरचा सर्व टेलीव्हिजनच्या जगतात सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम ठरला. या मालिकेच्या गोकुळधाम सोसायटीत बरीच विविधांगी कुटुंबे एकत्र राहतात.

खरतरं ही कुटुंबे भारताचं एकप्रकारे “विविधतेतील एकता” या गोष्टीच प्रतिनिधित्व इतक्या बखुबीने करते की सर्वकाही “लाजवाब” म्हणावसं वाटतं. यातली जेठालाल ही भुमिका म्हणजे सर्वात हुरहुन्नरी आणि कायम संकटांचा सामना करावा लागणारी अशा प्रकारे रंगवल्या गेली आहे. जेठालाल एखाद्या संकटात आला म्हणजे, रसिकप्रेक्षकांच्या ओठांवर हसू फुलणारं असं समीकरण होऊनच गेलं आहे. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने खरतरं जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच बॉलीवुडमधील करियरचं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असं म्हणता येईल. जेठालाल या पात्राच्या भोवती या गोकुलधाम सोसायटीमधील इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी फिरत असतात की सांगता येत नाही. दिलीप जोशी तसे एक नाटकांमधून आलेले अभिनेते आहेत. आजवर या मालिकेतून त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीने, लोकांच्या प्रेमाने ते इतरांचे नेहमी आभार मानतात. आपल्या कलेला एका योग्य माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आलं, यात दिलीप जोशी यांना समाधान आहे.

दिलीप जोशी यांची रिल पत्नी अर्थात दयाबेन आजवर बऱ्याच या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्याची पहायला मिळाली आहे. परंतु आज इथे आम्ही तुम्हाला जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्या खऱ्या पत्नीबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. जयमाला जोशी असं दिलीप जोशी यांच्या पत्नीचं नाव आहे. जयमाला एक गृहिणी आहे. शिवाय जयमाला अनेकदा दिलीप जोशी यांच्यासोबत काही ठराविक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरीदेखील लावत असते. दिलीप जोशी आणि जयमाला यांची जोडी अगदी भन्नाट आणि दिसायला तितकिच एकमेकांना साजेशी ठरल्याची कळून येते. जयमाला आपल्या पतीबद्दल फारसं कधी काही कुठे बोलताना पहायला मिळतं नसल्या तरी त्यांना पती दिलीप जोशींच्या आजवरच्या कामावर फार आनंद आणि एक समाधान असल्याचं चेहऱ्यावर ठळकपणे दिसून येतं.

दिलीप जोशी आणि जयमाला यांना दोन मुलेदेखील आहेत. ऋत्विक आणि नियती अशी त्या दोघांची नावे आहेत. जेठालाल अर्थात दिलीप जोशी एकेकाळी जेव्हा नाटकांमधून काम करून नंतर सिनेसृष्टीत आपला जम बसवू पाहत होते तेव्हा त्यांना अनेक सहाय्यक भुमिका मिळत होत्या आणि त्यांनी विनोदात्मक शैलीत त्या अगदी व्यवस्थितरित्या निभावल्यादेखील. परंतु अल्पावधीतचं तेही काम मिळणं बंद झालं होतं आणि अशातच त्यांना एका पात्राने त्यांच्या जीवणाला अगदी वेगळीच कलाटणी दिली. अर्थात हे पात्र म्हणजेच जेठालाल. दिलीप जोशी आजवल सलमान, शाहरूख, अक्षय कुमार यांच्या सिनेमांमधून बऱ्याचदा स्क्रिनवर झळकले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!