कलर्स मराठीवरील लोकप्रिय कलाकार कविता लाड आणि ऋजुता देशमुख म्हणतं आहेत “नवरा असावा तर असा” !
कलर्स मराठी एक आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे “नवरा असावा तर असा”. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर करणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि स्वरूप काय असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता होती. आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या नवऱ्याला या खेळात भाग घ्यावा लागणार आहे. नवरा खेळणार आणि बायको जिंकणार असं या कार्यक्रमाच स्वरूप प्रेक्षकांना कळलचं आहे. प्रत्येक स्त्रीसाठी नवरा म्हणजे जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ असतो. कलर्स मराठीवरील काही लोकप्रिय कलाकार देखील म्हणत आहेत “नवरा असावा तर असा”. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील माधुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कविता लाड तसेच ‘तू माझा सांगाती मालिके’मधील आवली म्हणजे ऋजुता देशमुख देखील असचं काहीसं म्हणत आहेत. फक्त कलर्स मराठीवरीलच नाही तर सोनाली खरे, अलका कुबल यांनी देखील म्हंटले “नवरा असावा तर असा”.
‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील माधुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कविता लाड यांनी काही अनुभव शेअर केले ज्यामुळे त्यांना “नवरा असावा तर असा” म्हणावेच लागले “लग्नानंतर दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येतात. माझी लाइफस्टाईल अशी होती कि, सगळं वेळेत करायचे, पण नवरा advertisingक्ष्रेत्रामधला असल्याने त्याची लाइफस्टाईल ही खूपच वेगळी होती. त्याला मला कधीकधी घेऊन पार्टीला जायचं असायचं आणि मी जाऊ नव्हती शकतं ज्याचं कारण एकच “शुटिंग”. पण, मुलगा झाल्यानंतर मी प्रायोगिक नाटकांमध्ये कामं करत होते, तेंव्हा विंगमध्ये माझा नवरा छोट्याश्या बाळाला घेऊन उभा रहायचा, त्याला खेळवायचा, तू कामं कर मी सांभाळतो बाळाला असं म्हणायचा. माझ्या आयुष्यात हे जे क्षण येतं गेले त्या प्रत्येक क्षणी मला वाटले कि, “नवरा असावा तर असा”.
‘तू माझा सांगाती’ मालिकेमधील “आवली’ म्हणते,” नवरा बायकोमधील भांडण तर सगळ्यांच माहिती आहेत. आमच्यात पण होतात, पण त्याहून महत्वाचं मला वाटत कि, माझा नवरा जे माझे लाड करतो म्हणजे माझं खूप हेक्टिक शेड्युल असेल तर मला सेटवरून घ्यायला येतो, माझ्यासाठी घरामधली छोटी – मोठी कामं करतो हे मला कुठे तरी खूपच महत्वाचं वाटतं. या गोष्टींमुळे मला पण वाटतं “नवरा असावा तर असा”