दक्षिण-आशियाई ओटीटी कंटेंटमधील जागतिक लीडर यपटीव्हीने भारताच्या सर्वात जुन्या संप्रेषण सेवा प्रदाता बीएसएनएलबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. आपल्या श्रेणीत अग्रणी असलेल्या या दोन्ही कंपन्यांनी मोबाईल आणि निश्चित लाइनसाठी व्हिडिओ आणि ब्रॉडबँड तंत्रज्ञान सेवांसाठी ट्रिपल प्ले भागीदारीमध्ये प्रवेश केला आहे.
बीएसएनएल ही एकमेव सेवा प्रदाता मानली जाते जी आयसीटी क्षेत्रातील ग्रामीण-शहरी डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी नियोजित पुढाकार घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन उद्योग-नेत्यांचे एकत्र येणे त्याच दिशेने टाकलेले आणखी एक केंद्रित पाऊल असेल. विशेषत: टियर 2 आणि 3 मार्केटसह बीएसएनएलच्या संपूर्ण भारतातील अतुलनीय आवाक्याला यपटीव्हीच्या व्यापक आणि विशेष कंटेंट लायब्ररीच्या उत्कृष्ट आणि स्केलेबल तंत्रज्ञानाच्या सिद्ध कामगिरीची जोड मिळाल्यास, दोन्ही ब्रँड एकत्रितपणे भारतात आदर्शवत मूल्य प्रस्ताव तयार करतील.यपटीव्हीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उदय रेड्डी म्हणाले, “बीएसएनएलसारख्या उद्योग धुरिणासह सहयोग केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. या संबंधामुळे आम्हाला बीएसएनएलच्या विशाल नेटवर्कचा फायदा घेण्याची आणि वाढत्या वापरकर्ता समूहासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान उत्पादने आणि वैशिष्ट्ये सादर करण्याची संधी मिळाली आहे. यपटीव्हीमध्ये, आम्ही सोप्या परंतु प्रभावी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे अत्याधुनिक मनोरंजन सोल्यूशनमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी दृढ आहोत. आम्ही बीएसएनएलच्या व्यापक वापरकर्ता समूहाकडून दीर्घकालीन संबंध आणि सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करतो.”
बीएसएनएलचे सीएमडी श्री प्रवीण कुमार पुरवार हाच विचार मांडत पुढे म्हणाले, “दहा वर्षांपासून ओटीटी क्षेत्रात अग्रगण्य राहून यपटीव्ही बदलत्या काळासोबत वेगाने विकसित झाले आहे, लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा कॅच-अप टीव्ही किंवा विशेष ओरिजनल्ससारखी उत्कृष्ट डिजिटल आणि व्हिडिओ मनोरंजन उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी विघटनकारी तंत्रज्ञानाचा फायदा उठवला आहे. भारतातील ग्राहकांना प्रभावी मूल्य प्रदान करण्यासाठी यपटीव्हीशी संबद्ध झाल्याचा आम्हाला आनंद आहे.”