नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जागोजागी विजयाचा जल्लोष साजरा करीत होते याला अपवाद मात्र ठरलेत ते सतत चौथ्यांदा निवडून येणारेअचलपूर चे आमदार बच्चू कडू 25 ऑक्टोबर ची पहाट दिवाळी चा पहिला दिवस बच्चूभाऊचे हजारो समर्थक विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते, सर्वीकडे एकच आनंदमय वातावरण असतांना बच्चूभाऊ ची धावपळ मात्र वेगळीच चालू होती ..!

भाऊंनी सर्वांना एकच विनंती केली की थोडे थांबा मला तत्पूर्वी माझ्या मित्रांची आंघोळ घालून येवू द्या. असे बोलुन बच्चूभाऊ “पूर्णामाय” अपंग व अनाथ पुनर्वसन केंद्रावर दाखल झाले.. दरवर्षी दिवाळीची सुरुवात बच्चूभाऊ येथूनच करतात.
येथील सर्व अनाथ अपंग मुलं मुलींना स्वतःच्या हाताने उटणे लावून अभ्यंगस्नान घालतात.

नविन कपडे , मिठाई , व त्यांच्या सोबत फटाके फोडून काही वेळ त्यांच्या सोबत घालवून सर्वांना शुभेच्छा देतात. या प्रसंगी त्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मुकबधीर मुलांच्या मनातील काय भाव असतील ते वेगळे सांगावे लागत नाही..