मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकताच अमृता ने ट्विटर वर 100k फॉल्लोवर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. सध्या अमृता खानविलकर मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राझी’ या चित्रपटा मध्ये आलिया भट सोबत काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असं अमृता खानविलकर ने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृता ची मैत्री अधिक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू!  ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या. अमृता हे पाहून अगदी भारावून गेली, अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे. ज्यात ती म्हणतेय, “आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे,तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे.’राझी’ हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे और ये करके आपने उसपे मोहर लगा दी ….   ”