मित्रांनो!, बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेतील एक चमकता ध्रुवतारा म्हणजेच अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हे त्यांच्या सुपरहिट चित्रपटांसाठी गाजलेले अभिनेते आहेत. त्यांच्या चित्रपटांनी आणि गाण्यांनी सिनेसृष्टीत सगळीकडे प्रसिद्धी मिळवली आहे. मित्रांनो!, अमिताभ बच्चनचे सुपरहिट गाणे ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे तर तुमच्या लक्षात असेलच.

१९९१ साली आलेला चित्रपट ‘हम’ ज्याने संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळवली होती. या गाण्यातील अमिताभच्या डान्स स्टेप्स रातोरात सुप्रसिद्ध झाल्या होत्या. आजही जेव्हा केव्हा हे गाणे वाजते तेंव्हा रसिकजन त्या स्टेप्स पुन्हा पुन्हा करून आनंद लुटतात. पण खरे सांगायचे तर अमिताभ पेक्षाही प्रेक्षकांच्या नजरा जीच्यावर सर्वात जास्त रोखलेल्या होत्या ती म्हणजेच गाण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री किमी काटकर.

लाल रंगाच्या फ्लोरल ड्रेस मध्ये किमी अत्यंत दिलखेचक आणि मदमस्त सुंदर दिसत होती. त्या जमान्यातील हे सर्वात सुप्रसिद्ध गाणे मानले जात होते. किमी काटकर यांच्या अभिनयाने लाखो लोकांचे हृदय जिंकले होते. परंतु मित्रांनो!, काय हे तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या जमान्यातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आज-काल कुठे आहे आणि काय करते?

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही, सध्या किमी काटकर नक्की आहे कोठे आणि करते तरी काय? सोशल मीडियावर किमीचा एक फोटो व्हायरल झाला आहे ज्याला पाहून तिला ओळखणे जवळपास अशक्यच आहे. किमी पहिल्यापेक्षा खूप बदललेली आहे.

वाढत्या वयामुळे तिचे सौंदर्य जरासे कमी झालेले असले तरीही हा तर नैसर्गिक सृष्टीचाच नियम आहे. निसर्ग नियमाने, काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत असतोच. पण आजही हेमामालिनी, रेखाजी यांच्यासारख्या काही अभिनेत्री या अशा आहेत ज्यांची सुंदरता वयाच्या अनुसार वाढत जात आहे. मात्र किमीच्या सुंदरतेच्या बाबतीत थोडी कमी नक्कीच आलेली आहे. असो…

पण तिचे सुंदर हास्य आजही लाखो लोकांचे हृदय प्रसन्न करूच शकते. जुम्मा चुम्मा गर्ल या नावाने प्रसिद्ध किमी आपल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक झाली होती. या गाण्यापासून तिने खूप प्रसिद्धी मिळवली आणि या गाण्याने ती रातोरात बॉलीवूड इंडस्ट्रीत मोठी अभिनेत्री बनली होती. या गाण्यानंतर सगळीकडे फक्त कीमीचीच चर्चा होती. यापेक्षाही किमी आणखी एका नावांनी खूप प्रसिद्ध झाली होती.

१९८५ साली आलेला चित्रपट ‘टारझन’ने तिला ‘टारझन गर्ल’ चा किताब दिला होता. या चित्रपटात कीमीने खूप सारे बोल्ड व बिनधास्त सीन्स दिले होते. या चित्रपटानंतर तिला सेक्स सिम्बल म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. किमी चे नाव तत्कालीन हॉट अँड बोल्ड अभिनेत्रीत सामील झाले होते.

११ डिसेंबर १९६५ ला किमी चा मुंबईत जन्म झाला होता. १७ वर्षांच्या वयातूनच किमी मॉडलिंग च्या दुनियेत आली होती. तिचा पहिला चित्रपट ‘पत्थर दिल’ हा होता. चित्रपट असफल ठरल्यानंतर ती ‘टारझन’ नावाच्या दुसऱ्या चित्रपटात दिसली गेली होती. या चित्रपटात तिने ग्लॅमरस अंदाजने तिने लोकांचे मन जिंकले होते.

किमीने त्या वेळेच्या बहुतेक सर्व मोठमोठ्या फिल्मस्टार्स जसे धर्मेंद्र, अमिताभ, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, अनिल कपूर आणि गोविंदा इ. अनेकांसोबत काम केलेले आहे. गोविंदा सोबत तिने खूप चित्रपट केले आहेत. यांची जोडी दशकांत खूप प्रसिद्ध होती.

पण अचानक कीमी ने बॉलीवूड पासून फारकत घेतली. तिने चित्रपटात काम करायचेच सोडले होते. सलगच्या फ्लॉप चित्रपटांमुळे तिने लग्न करण्याचे ठरवले होते. आणि मग तिने पुणे येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि ॲड फिल्म निर्देशक शांतनु शोरे याच्यासोबत लग्न केले.

त्यांना सिद्धांत नावाचा एक मुलगा आहे आणि आपल्या या छोट्याशा परिवारासोबत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आणि कधी कधी औंध, पुणे येथे ती मस्तपैकी फॅमिली लाईफ एन्जॉय करतेय. आज आम्ही तुमच्यासाठी किमी काटकर ची काही लेटेस्ट फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही तिला ओळखू शकणार नाहीत.