बॉलिवूडच्या या मायनगरीशी अनेक लोकं जोडली गेलेली आहेत. त्यांच्यात मैत्री, प्रेम, राग, द्वेष, मत्सर अशा सर्व प्रकारचे संबंध प्रस्थापित होत असतात. चित्रपटांमुळे त्यांच्यामध्ये भांडणे, होतात, तर कधी हाच चित्रपट त्यांना एकत्र आणण्याचेही काम करत असतो.

याआधीही अनेकवेळा बॉलिवूडमध्ये असे घडलेले आहे. एकेकाळी खूप चांगले मित्र होते. चित्रपटांमुळे एकत्र आल्यावर मानापमान नाट्य वाद झाल्यामुळे वेगळे झाले. परत सगळं विसरून चित्रपटांनीच त्यांना एकत्र आणले.

हे असं चालूच असतं. अमिताभ शत्रुघ्न पासून तर सलमान शाहरुख पर्यंत हे चालूच आहे. असंच काहीसं घडले ते मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि पंजाब दा पुत्तर सनी देओल या दोन सुपरस्टार्स दरम्यान…

एकच गोष्ट घडली पण, पुढील २६ वर्षांत आमिर खानने, सनी देओल सोबत कधीच चित्रपटांत काम केले नाही. तर त्याचे असे झाले की… ९० च्या दशकात, सुप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा ‘ड’र’ चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी यशजींनी सर्वात प्रथम आमिर खानला विचारले. आमिर खानला चित्रपटाची कथा खूप आवडली. तो चित्रपट करायला तयार झाला.

फक्त त्याला, चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये एक छोटासा बदल हवा होता. क्लायमॅक्स असा होता की, सनी देओल आणि आमिर खान दोघांमध्ये मारामारी होईल. आमिर खान सनी देओलला दोन वेळा चाकूने भोसकणार आणि हिरोईन म्हणजेच, जुही चावला ला बोटीत घेऊन दूर समुद्रात निघून जाणार.

इकडे सनी शुद्धीवर आला की तो भोसकलेला चाकू काढून कापडाने जखम बांधून, बोटीवर येऊन आमिरला मारेल. पण हा क्लायमॅक्स आमिरला पटत नव्हता. त्याचे म्हणणे होते कि, जर मी सनी देओलला चाकूने दोन वेळा भोसकले आहे तर सनी मधे इतकी ताकदच नसेल की तो बोटीवर येईल आणि मला मारेल सुद्धा.

असा क्लायमॅक्स परफेक्ट नाही. लोकांना हे खरे तरी वाटेल का ? यश चोप्राजींनी आमिर खानचे म्हणणे ऐकले. ते म्हणाले , ‘ थोडा वेळ थांब. याच्यावर मी सनी देओलसोबत सुद्धा चर्चा करतो, आणि त्यानंतर आपण मिळून के तो निर्णय घेऊयात.’

नंतर यश चोप्रा सनी देओलकडे गेले. सनी देओल त्याकाळी टॉप चा सुपरस्टार होता. यशजींनी आमिर खानचा मुद्दा सनी देओलला सांगितला, की आमिर खान म्हणतोय की, मी दोन वेळा चाकू भोसकल्यानंतर सनी मधे इतकी ताकद कशी असेल की, तो मला मारायला थेट बोटीवर येईल.

त्यावर सनी देओलला खूप हसायला आले आणि तो म्हणाला की, पिक्चर मधेच काय, पण आत्ता खरोखर जरी आमिर खानने मला दोन वेळा चाकूने भोसकले तरी माझ्यात इतकी ताकद असेल की, मी उठून खरच त्याला इथंच मारेल . आमिर खानला जेव्हा सनीचे हे बोलणे समजले तेव्हा त्याला खूप राग आला. इतका की आणि त्याने ह्या चित्रपटात काम करायलाच नकार दिला.

नंतर हा रोल शाहरुख खानकडे गेला. त्या वेळी नवीन असलेल्या शाहरुखला कामाची गरज होतीच. गरजेपोटी त्याने हा रोल आहे तसा स्वीकारला. शाहरुख खानने त्या रोलचं सोनं केलं.

शाहरुखच्या त्या भूमिकेमुळे यश चोप्रा इतके प्रभावित झाले कि त्यांनी त्या “डर” मधील शाहरुखच्या भूमिकेला चांगल्याप्रकारे फोकस आणि प्रेझेंट केले. जेव्हा चित्रपट रिलीज झाल्यावर सनी देओलने पाहिले की चित्रपटात त्याच्यापेक्षा शाहरुखच्या भूमिकेला जास्त महत्व देण्यात आले आहे. तो सुद्धा इतका नाराज झाला की, त्यानंतर त्याने “यशराज फिल्म्स” सोबत पुढे कधीच चित्रपट केला नाही.

झालं काय? तर, आमिर खान ‘डर’ आणि सनी देओल यशराज कॅम्पच सोडून गेला… मधल्या मधे फायदा झाला तो शाहरुखचा. आणि यशराजचा शाहरुखच्या यशातील वाटा किती मोठा आहे? हे तर तुम्ही जाणताच…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.