तुमच्यापैकी अनेकांचा कदाचित हे वाचूनच आश्चर्य झालं असेल की, अमेय वाघ याच लग्न झालयं? अर्थातच 2017 या सालात तो विवाहबंधनात अडकला आहे. परंतु आजही जेव्हा केव्हा जिथे कुठे अमेय वाघ हा अभिनेता आपल्याला दिसतो तेव्हा चुकूनही कुणाला वाटणार नाही की, याचं लग्न झालं असेल.

अर्थात त्यामुळेच त्याला मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणुनदेखील ओळखलं जातं. तो दिसायला एकदमच हॅन्डसम आणि चार्मिंग आहे यात काही वादच नाही. आता मुळात एक बाब म्हणजे, अमेय वाघची पत्नी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे. त्याला कारण आहे तिही अगदी एखाद्या राजकन्येप्रमाणेच सुंदर दिसते. अमेय वाघ आणि त्याची पत्नी या दोघांचा साहजिकचं प्रेमविवाह झाला आहे.

अमेय वाघ याने आजवर नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज व नानाविध कलाकृतीच्या प्रकारांमधून सर्व रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन केल्याच पहायला मिळतं आहे. खरतरं सध्याच्या घडीला तो एकप्रकारे अनेक तरूण तरूणाईच्या गळ्यातला ताईतच झाल्याप्रमाणे आहे. त्याची एखादी नवी कलाकृती येण्याची वाट आणि लगेच त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची अगदी लाट उसळते.

साजिरी देशपांडे हिच्यासोबत त्याने तब्बल 13 वर्षांपासून एकत्र वेळ घालवल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. साजिरी देशपांडे कॉलेजमधे असताना अमेय वाघ च्या नाटकाची तालीम पाहण्यासाठी येत असायची. आणि अगदी त्याचवेळी ही जोडी हळूहळू एकत्र येण्याची सुरूवात झाली होती. अमेय आणि साजिरी या दोघांची लव्हस्टोरी थेट पुण्यात कॉलेज जीवणातून सुरू झाली होती.

अमेय वाघ याची पत्नी आजवर फार कुठे झळकल्याची तेवढ्या प्रमाणात पहायला मिळाली नसली तरीदेखील दिवाळीच्या वेळी तिला अमेयसोबत एका व्हिडिओच्या माध्यामातून पहायला मिळालं होतं. अमेय वाघ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याच पहायला मिळतं. तो त्याच्या आगामी प्रत्येक प्रोजेक्टबाबत हरएक गोष्ट चाहत्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतो. अमेय वाघ भारतीय डिजीटल पार्टी अर्थात भाडीपाचादेखील एक भाग आहे. त्याने या माध्यमातून अनेकदा युट्यूबवर चाहत्यांच मनोरंजनदेखील केलं आहे.

सध्या लाॅकडाऊनमधील काळात अमेयने स्वत:च युट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे ज्या माध्यमातून तो काही विनोदी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या या चॅनेलवरही रसिकप्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. अमेय वाघ याच्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेला रसिकप्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली होती.

याखेरीज त्याचा धुरळा हा सिनेमाही चांगलाच प्रसिद्धीस उतरला. मुरंबा, फास्टर फेणे या सिनेमांमधूनही त्याने सर्वांची मने जिंकली. आता अमेयचा नवा सिनेमा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे, त्याच नाव आहे झोंबिवली. याशिवाय असूर या हिंदी वेबसिरीजमधे पहिल्या सिझनमधे झळकलेला अमेय वाघ दुसऱ्या सिझनमधूनही या वर्षातच प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. अमेय वाघ नेहमीच विविध प्रकारच्या भुमिका स्वत:वर आजमावून प्रयत्न करणारा एक हरहुन्नरी कलाकार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!