भारताचा माजी क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप 2011 चा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला सर्वांचा लाडका चहेता युवराज लवकरच बाबा होणार असल्याची खबर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रंगली आहे. याबाबत स्वत: युवराज सिंग याच्याकडून सर्वच चाहते अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या युवराजने सोशल मीडियावर जे काही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत त्यामधून त्याची पत्नी हेजल ही गर्भवती असल्याच दिसून येत आहे. आणि याच कारणास्तव अनेकांची रूची आता ज्युनियर युवराज अर्थात युवराजच्या घरात कधी बाळाचा पाळणा हालणार याकडे लागली आहे.

नुकताच हेजलचा वाढदिवस पार पडला. याच खास प्रसंगी युवराजने काही पोस्ट शेअर केल्या आहेत. अनेक युजर्सकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तही थेट हेजलला गर्भवती असल्याबद्दलही शुभेच्छा देण्यात आल्याच पहायला मिळालं आहे. अनेकांनी युवराजच्या पोस्टवर त्याला प्रश्नदेखील विचारले आहेत. युवराजने मात्र सध्या काहीच स्पष्टपणे कुठेही सांगितलेलं नाही.

जगभरात सिक्सर किंग ही ओळख निर्माण केलेला भारताचा एक अतिउत्कृष्ट असलेल्या युवराजची हेजलसोबत प्रेमकहाणी थोडीशी अगदीच हटके आणि संघर्षाचीदेखील राहिली आहे. हेजलने लग्नानंतर स्वत:च नाव बदलून गुरबसंत कौर असं केलं आहे. हेजल मुळची इंग्लंडमधील आहे.

संत बलविंदर सिंग यांनी युवराज व हेजल यांच्या लग्नसोहळ्यावेळीच हेजलला नवं नाव दिलं होतं. बॉलीवुडमधे बॉडीगार्ड या सिनेमातून हेजलने आपल्या अभिनयाने नक्कीच रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. 30 नोव्हेंबर 2016 साली विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीच्या आयुष्यात आता नवी नवजात बालकाची इनींग कधी सुरू होणार ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.

सर्वांच्या लाडक्या युवराज बद्दल जे काही बोललं अथवा लिहलं जाईल ते नक्कीच कमी ठरेल. आपल्या सर्वांना माहितच आहे की, युवराजने कॅन्सरसोबत लढत असतानादेखील देशाकरता मोलाच योगदान देत भारताला 2011 च्या वर्ड कपमधे विजय मिळवून देण्यात अगदी मोलाचा वाटा उचलला होता. युवराजने 2000 सालापासून ते 2017 पर्यंत तब्बल 17 वर्षांमधे भारतासाठी कित्येक चांगल्या आठवणी निर्माण करत भारताला अशक्य वाटणारे विजयही मिळवून दिले.

युवराजने जेव्हा केव्हा मैदान गाजवले तेव्हा तेव्हा भारतीय क्रिकेटरसिक त्याच्या खेळीवर फिदाच होत राहिला. युवराजने 2007 च्या ट्वेंन्टी ट्वेंन्टी वर्ल्ड कपमधे इंग्लडंविरूद्ध केवळ 12 बॉलमधे 50 रन्स मारत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला, शिवाय त्याने याच मॅचमधे 6 बॉलवर 6 सिक्सेसदेखील लगावले.

युवराज सिंग याच्याकडून भारताला अनेकदा अशक्यप्राय अशे विजयदेखील सहजरित्या काबिज करता आले. आजवर 4 थ्या नंबरवर भारतासाठी फलंदाजीची भुमिका पार पाडलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी भारतीय संघासाठी तो एकमेव उत्तम दर्जाचा खेळाडू ठरला आहे. क्रिकेटच्या जगतात फिल्डींग अर्थात क्षेत्ररक्षणातही तो अव्वल होता. शिवाय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याचा नेहमीच ऑल राऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला आहे.

गरज पडल्यास विकेट मिळवून देण्यासाठी त्याने केलेल्या गोलंदाजीने नेहमीच विकेट्स पटकावत भारताला अनेकदा चांगल्या स्थितीत पोहोचवले आहे. युवराज सर्वच बाजूंनी परिपूर्ण आणि अष्टपैलू खेळाडू होता यात मात्र काहीच शंका नाही. सध्यातरी सर्वांच लक्ष आता ज्युनियर युवराज सिंगकडे लागलं असल्याच पहायला मिळतं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!