आमिर खानची एक सवय वाखाणण्यासारखी आहे, ती म्हणजे ज्या वेळी त्याची फिल्म रिलीज होते तेव्हा फिल्म क्रिटिक्स, सर्वसामान्य प्रेक्षक यांच्या उस्फुर्त आणि प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेण्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो.

आमिर खानची फिल्म आहे म्हंटल्यावर सर्व कॅटेगरीतील लोक अगदी रांगेत उभे राहून, तिकीट काढून, थिएटरला जाऊन फिल्म पाहतात. याचे लेटेस्ट सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘दंगल’ फिल्म आहे. आमिरच्या ब्लॉकबस्टर दंगलने तर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मो’ड’ले. दंगलने संपूर्ण जगभरातून २००० कोटींपेक्षा जास्त कमाई करून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय फिल्म्स मधे प्रथमस्थान प्राप्त केले होते.

याच सुपरस्टार अमिर खानची आणखी एक लक्षात येण्याजोगी गोष्ट, जी आमिर आजही क’टा’क्षा’ने पाळतो… नव्हे नव्हे… टाळतो आणि जी गोष्ट आज या लेखाचा विषय आहे ती म्हणजे, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या कोणत्याही नावाजलेल्या मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला आमिर खान नेहमीच अनुपस्थित असतो. किंबहुना गाजावाजा असलेले, भपकेदार, दिमाखदार असे अवॉर्ड फंक्शन आमिर क’टा’क्षाने आणि जाणीवपूर्वक टा’ळ’तो.

अर्थात त्याचे कारणही मोठेच आहे. नेमकी अशी कोणती घ’ट’ना घ’ड’ली की, आमिर खान पुन्हा कधीच भव्य अवॉर्ड फंक्शनमधे सहभागी झाला नाही. तर किस्सा असा आहे की…

सन १९९५ मधे आमिर खानची फिल्म ‘रंगीला’ जी सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केली होती. ती रिलीज झाली होती. फिल्म मधे दोन मेन हिरो होते. जॅकी श्रॉफ आणि आमिर खान.

या रंगीला फिल्मचा आणखी एक महत्वाचा किस्सा असा की, रंगीला फिल्म मधे जी भूमिका आमिर खानने केली होती , त्या भूमिकेसाठी अगोदर शाहरुख खानला निवडले होते. परंतु त्यावेळी शाहरुख खान हा करण-अर्जुन, ड’र, बाजीगर अशा सुपरहिट फिल्म करून स्टार झाला होता.

म्हणून मग “रंगीला” सारख्या डबल हिरो फिल्म मधे काम करण्यासाठी त्याने न’का’र दिला. शाहरुख खानच्या न’का’राने रंगीला फिल्मची गणितेच बदलून टा’क’ली. नंतर शेवटी आमिर खान, जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत रंगीला फिल्म पूर्ण झाली.

रंगीलामधे आमिर खानची भूमिका एका टपोरी भाईगिरी स्टाईलच्या तरुणाची होती. या रोलसाठी नेहमीप्रमाणेच आमिरने प्रचंड मेहनत घेतली. तो टपोरी भाषा शिकला, जाळीदार बनियान, शर्टला खालून गा’ठ, डो’क्या’वर तिरकी टोपी अशा बारीक-सारीक गोष्टींच्या डिटेलिंग वर सुद्धा त्याने खूप मेहनत घेतली.

सदासर्वदा तो टपोरी स्टाईलनेच राहत होता. त्याचे वा’ग’णे बोलणे सगळे अगदी अस्सल टपोरी झाले होते. फिल्म हिट झाली. फिल्म क्रिटिक्स आणि प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया आणि आमिरची मेहनत सर्वाचं कॉम्बिनेशन जुळून आले होते. आमिरसह सगळ्यांनाच वाटलं रंगीलासाठी इतकी सर्व मेहनत घेतलीय आणि फिल्म सुद्धा हिट झाली आहे.

तर यावर्षीचा ‘फिल्मफेअर’चा ‘बेस्ट ऍक्टर’चा अवार्ड १००% आमिरलाच मिळणार. परंतु कुठे, कशी काय किल्ली फिरली आणि असे काहीच घडले नाही. १९९५ चा ‘फिल्मफेअर’चा ‘बेस्ट ऍक्टर’अवार्ड शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ फिल्मसाठी मिळाला. आमिर खान आणि फिल्म रसिकांना हा मोठाच ध’क्का होता. आमिरला या गोष्टीचे खूप वा’ई’ट वाटले.

आमिर खानने एका मुलाखतीत अवार्ड फंक्शनमध्ये न जाण्याचे हे कारण सांगितले होते की, “सुरुवातीला अवार्ड फंक्शनमध्ये जाण्यासाठी मी खूपच उत्सुक असायचो. परंतु आता जेंव्हा मला अवॉर्ड फंक्शनचे सेटिंग आणि सेटअप माहिती झाले, तेव्हापासून मी अवॉर्ड फंक्शनला जाणेच सोडून दिले.

इथून पुढे कोणत्याच मोठ्या आणि लोकप्रिय अवॉर्ड फंक्शनला जायचे नाही असं मी ठरवूनच टाकले. फक्त जे टीव्हीवर टेलिकास्ट होत नाहीत अशाच अवॉर्ड फंक्शनल मी जात असतो. आपण फक्त आपले काम करायचे, बाकी… मायबाप रसिक प्रेक्षक आहेतच.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.