मराठी मालिकां मध्ये सध्या आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. त्यातील सर्वच पात्र प्रेक्षकांना आपापल्या घरातील किंवा जवळची वाटत आहेत.
म्हणून ती टीआरपीच्या बाबत ही आघाडीवर आहे. त्या मालिकेत काम करणारी अरुंधती सुद्धा खूप लोकप्रिय आहे. आता त्यात जे नवीन पात्र आलेलं आहे, ते सध्या खूप चर्चेत आहे. आता ते काय ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
स्टारप्रवाह ही वाहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रस्थानी असलेली पाहायला मिळत आहे वाहिनीच्या तब्बल पाच मालिकांना प्रेक्षकांनी पुरेपूर पसंती दर्शवली असून यात आई कुठे काय करते या मालिकेचाही समावेश आहे. आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आता खूपच रंजक होताना दिसत आहे. त्यात प्रत्येक एपिसोड नव्या मोडवर आहे. त्यामुळे रसिक मालिका आनंदाने पाहत आहेत. गृहिणी तर या मालिकेच्या आणि पात्राच्या चाहत्या आहेत.
सध्या मालिकेचं कथानक पाहिलं तर एकीकडे अभिला नोकरी लागल्याने अरुंधतीसह सर्वच कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे तर रजनी कारखाणीसची या मालिकेत नव्याने एन्ट्री झाल्याने मालिका अधिकच उ’त्कं’ठा’व’र्ध’क झाली आहे.
गौरीची आई रजनी कंपनीची मालकीण असल्याने अनिरुद्धला आपली नोकरी टिकवण्यासाठी रजनीला कसे पटवणार ते येत्या काही भागातच पाहायला मिळेल. तूर्तास रजनी कारखानीसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सुषमा मुरुडकर” यांनी.
सुषमा मुरुडकर यांनी या मालिकेअगोदर हिंदी मालिकेतून काम केले आहे. तर काही व्यावसायिक जाहिरातींमधूनही त्या झळकल्या आहेत. “इश्क में मरजावा २”,” कुंडली भाग्य ” या हिंदी मालिका तसेच ‘जागो ग्राहक जागो’ च्या जाहिरातीत देखील झळकल्या आहेत. याअगोदर एक टिकटॉक क्वीन म्हणून तिच्या व्हिडीओजना चांगलीच पसंती मिळाली होती.
आई कुठे काय करते या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकेत झ’ळ’क’ण्या’ची संधी मिळाली असल्याने सुषमा मुरुडकर प्रकाश झोतात आल्या. रजन कारखानीसची द’म’दा’र भूमिका वाट्याला आल्याने त्या खूप खुश देखील आहेत.
असे अनेक पात्र त्यातील हि’ट आहेत. सर्वच पात्र लोकप्रिय होत आहेत. आणि मालिका घराघरात पोचवत आहेत. त्या सर्वांना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.