Balewadi Stadium Booked For Milind Shindes Films Shooting

1118
मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बालेवाडीचं स्टेडियम बुक
 
– राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण 
– मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट
विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं शिवछत्रपती स्टेडियम आता चित्रपटांसाठीही सातत्यानं वापरलं जाऊ लागलं आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं चित्रीकरण बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बहुधा, या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटाचं प्रथमच बालेवाडी स्टेडियममध्ये चित्रीकरण करण्यात आलं आहे
हा चित्रपट अॅथलेटिक्सवर आधारित आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या शेड्यूलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यात आलं. या निमित्तानं स्टेडियममध्ये स्पर्धेसारखीच लगबग झाली होती. बालेवाडी स्टेडियममध्ये यापूर्वी ‘दंगल’सारख्या अनेक चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.
‘राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक हवा होता. महाराष्ट्रीत नाशित, रत्नागिरी आणि पुणे याच ठिकाणी ही सुविधा आहे. नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता चित्रीकरणासाठी महत्त्वाची होती. या स्टेडियममध्ये चित्रीकरणाचा अनुभव फार कमाल होता,’ असं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी यांनी सांगितलं.