Upcoming Marathi Movie ‘Kanika’ 2017 Release on 31st March 2017
Kanika 2017 Marathi Movie
मराठीत वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. मात्र, हॉररपट हा प्रकार मराठीत फारसा हाताळला गेला नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला Kanika ‘कनिका’ हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी Kanika ‘कनिका’ हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे.
“मराठीत सामाजिक किंवा विनोदी प्रकारचेच चित्रपट होतात असं एक चित्र आहे. मात्र, त्या पलिकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या खूप संवेदनशील असतात. त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. मराठीमध्ये हॉरर सूडकथा ही वेगळा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे,”, असं दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी सांगितलं.
या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे. पुष्कर यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सच्या संदीप मनोहर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमेय नारे यांच संगीत, कॅमेरामन चंद्रशेखर नगरकर तर कुलदीप मेहन यांनी संकलन केलं आहे