family-katta-marathi-movie-review
नात्यातील अबोल गोडवा असलेला ‘फॅमिली कट्टा’ Family Katta 2016

चित्रपट हा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही.  कारण समाजातील परिस्थिती चित्रपटांच्या माध्यमातून दाखवण्यात येते.  मग ती परिस्थिती राजकीय असो किंवा सध्याच्या घडामोडींवर आधारित असो. 

पण आज नात्यांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे कुठेतरी नात्यांवर विचार करुन समजूतदारपणा वाढेल.

नात्यातील अबोल गोडवा असलेला ‘फॅमिली कट्टा’

असाच एक समाजाला अथवा आपल्या व्यक्तींना विचार करायला लावणारा फॅमिली कट्टा हा मराठी चित्रपट आहे. फॅमिली कट्टा हा का पाहावा याची कारणे आम्ही तुम्हांला दिली होती.

वंदना गुप्ते यांची निर्मिती आणि माणसांना बांधून ठेवणारा आपल्या हक्काचा चित्रपट आहे ही फॅमिली कट्टा पाहायची ठळक कारणे आहेत.
‘फॅमिली कट्टा’ हे एक गोड सेलिब्रेशन आहे, जे कडू-गोड आठवणींनी परिपूर्ण आहे आणि वेगवेगळ्या मताची माणसांनी एकत्र आलेले कुटुंब आहे. एवढेच नव्हे तर या नात्यांमध्ये अबोल गोडवा दडलेला आहे. 

ही गोष्ट आहे सबनीस कुटुंबाची. एकमेकांपासून लांब गेलेले भाऊ-बहिण पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी निमित्त असते ते म्हणजे आई-वडीलांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाचे.

मधुकरराव सबनीस (दिलीप प्रभावळकर) आणि मालती सबनीस (वंदना गुप्ते) हे जोडपं पुण्याच्या घरात आनंदात आयुष्य जगत असतात.




त्यांच्या लग्नाच्या५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या कुटुंबाना ते एकक्ष आणायचे ठरवतात. मुंबईत राहणारी दोन मुलं आणि सुना, अमेरिकत असलेला नातू आणि अभिनेत्री असलेली नात, कोकणात राहणारा अविवाहित मुलगा, प्रेमविवाह झालेली मुलगी आणि जावई या सगळ्यांना एकक्ष आणण्यासाठी आई-वडिलांची विशेष मेहनत चालू असते.

आणि त्यांच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण साजरा करण्यासाठी सर्वांची आणि खास करुन समजूतदार नातवंडाची (गौरी नलावडे आणि आलोक राजवाडे) तयारी चालू असते.

पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सर्व काही सुरळितपणे चालेल किंवा कोणतेच अडथळे येणार नाही असं कधीच होत नाही.  चढ-उतार प्रत्येक नात्यांमध्ये-कुटुंबामध्ये येतो. मग सबनीस कुटुंबांबाबतीत नेमके काय घडले असेल आणि ते पण सुंदर सोहळ्याच्या दिवशी? मनातील प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा चलबीचल मनाला पूर्ण विराम देण्यासाठी सह कुटुंबासह ‘फॅमिली कट्टा’ नक्की पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here