colours-marathi-kon-hoeel-marathi-crorepati-season-3



कलर्स मराठी समवेत होणार महाराष्ट्राच्या ‘सुखाचा शुभारंभ’
‘कोण होईल मराठी करोडपती – पर्व ३’
 

 सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१६ पासून सोमवार ते बुधवार रात्री ९ ते १०.३० वाजता

महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा, आपल्या ज्ञानाने नशीब
बदलण्याची सुवर्णसंधी देणारा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम महामंच म्हणजे कलर्स मराठीवरील “कोण
होईल मराठी करोडपती” ! सातारा येथील महादेव आणि अनिता जाधव त्यांच्या जगण्याची लढाई लढताना,
आपल्या दैनंदिन जीवनातल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते.

खंडाळा तालुक्यातील एका लहानश्या गावातील
पोपट कासुर्डे आणि त्यांच्या पत्नीचे स्वप्न होते की, आपण कर्करोगग्रस्तांना मदत करावी तसेच आपण
आपल्या कुटुंबासमवेत भारत भ्रमण करावे, अशी इच्छा सांगलीच्या सविता पाटील यांची होती. आपल्या
स्वप्नांचा पाठपुरावा करायचा आणि ही स्वप्ने साकार करायची, आणि आनंदाला आलिंगन द्यायचे, या
संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे, मराठी टेलिव्हिजनच्या परिघातील लोकांचे
आयुष्य क्षणात बदलणारा कलर्स मराठीचा अद्वितीय कार्यक्रम, ‘कोण होईल मराठी करोडपती’. बिग
सिनर्जी निर्मित अत्यंत लोकप्रिय अश्या ह्या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपली
स्वप्ने साकार करण्यासाठी, अनेक वर्षे उराशी जपलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षांना सत्यात
उतरवण्यासाठी तसेच जीवनातील आपली छोटी – मोठी ध्येये गाठण्यासाठी ही एक नवीच संधी आपल्याला
मिळत असून, यावेळी बक्षिसाची रक्कम तब्बल तीन करोड रुपये इतकी विशाल आहे.

अत्यंत आकर्षक
अशा नव्या संकल्पना आणि उत्कंठेने काठोकाठ भरलेल्या आणि अत्यंत जादुई क्षणांनी सजलेल्या या
विलोभनीय आणि जीवनात कधीतरीच घेऊन येत असलेल्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्याऱ्या
कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१६ रोजी होत असून, दर सोमवार ते बुधवार रात्री ९.०० वाजता हा
कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

kon-hoeel-marathi-crorepati-swapnil-joshi




‘कोण होईल मराठी करोडपती’या कार्यक्रमाचा आजवरचा प्रतिसाद आणि प्रभाव याविषयी बोलताना, कलर्स
मराठी प्रमुख, व्हायाकॉम -18 चे अनुज पोद्दार म्हणाले की, कलर्स मराठीने आजवर अतिशय अर्थपूर्ण
आणि आशयसंपन्न असे कार्यक्रम दिले असून, त्याने समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत झाली
आहे. पहिल्या दोन वर्षात ‘कोण होईल मराठी करोडपती’या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या जीवनात एक चांगला
बदल घडवून आणला असून, मराठी मातृभाषा असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फायदाही मिळवून
दिला आहे. त्यामुळे यावेळी आम्ही या कार्यक्रमाला आणखी एका नव्या उंचीवर नेण्याचे ठरवले आहे.
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी आणि विक्रमी अशी बक्षिसाची रक्कम आम्ही
ठरवली आहे. तसेच अशा शोमध्ये जगात कुठेही आजवर दिली गेली नाही, अशी ‘चॅट लाईफलाईन’आम्ही
स्पर्धकांना देणार आहोत. आजचा मराठी भाषक प्रेक्षक हा सातत्याने नव्याच्या शोधात असल्याचे दिसून
येत आहे.

नवनव्या संकल्पना, ऊर्जेने भारलेले नवनवे कार्यक्रम, समकालीन व्यवहार आणि त्याला
सांस्कृतिक जोड देत यशाची आणि सुखा- समाधानाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासही तो सज्ज आहे.
म्हणूनच ‘कोण होईल मराठी करोडपती – पर्व ३’ च्या माध्यमातून आम्ही मराठी प्रेक्षकांना एक वेगळी
ओळख मिळवून देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

स्वप्नील जोशी यांना या शोचे होस्ट म्हणून नियुक्त करण्याबाबत अनुज पुढे म्हणाले की, संपूर्ण
महाराष्ट्रात स्वप्नील अत्यंत लोकप्रिय आहे. मला खात्री आहे की, स्वप्नीलमधील उत्साह आणि आपलेपणा
पाहता प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला असे वाटेल की, हो, या कार्यक्रमामुळे माझ्या जीवनात खरोखरच
एक सकारात्मक बदल घडू शकतो.

‘कोण होईल मराठी करोडपती – पर्व ३’ च्या अमाप लोकप्रियतेबाबत आणि होस्टबाबत बिग सिनर्जीचे
सिद्धार्थ बसु म्हणाले की, यावर्षी तरुण आणि लोभसवाणे व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि विशेष करुन
तरुणाईमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या, छोट्या तसेच मोठ्या पडद्यावरील या अभिनेत्यामुळे
महाराष्ट्रातील तरुण वर्ग या शोकडे नक्कीच आकर्षित होईल. स्वप्नील हा हजरजबाबी, उत्स्फूर्त, चार्मिंग
असा अभिनेता असून स्पर्धक आणि प्रेक्षकांना अगदी सहजपणे जोडून घेण्याचे त्याचे कसब
वाखाणण्याजोगे आहे.

अधिक मोठ्या रकमेचा म्हणजेच अर्थातच तीन कोटी रुपयांचा जॅकपॉट; तसेच
अद्वितीय अशी भारतातून प्रथमच सुरु होत असलेली ‘ग्रुप चॅट’ ही लाईफलाईन, यामुळे ‘कोण होईल
मराठी करोडपती – पर्व ३’ या शोची उत्कंठा नक्कीच वाढवेल असा आम्हाला विश्‍वास आहे.

swapnil-joshi-marathi-kon-hoeel-marathi-crorepati-season-3




 ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या प्रेरणादायी प्रभावाबद्दल, महाराष्ट्राचा लाडका स्वप्नील जोशी म्हणाला,
‘कोण होईल मराठी करोडपती हा मराठी प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ असून त्याद्वारे अनेकांना
आपल्या अपूर्ण अशा स्वप्नांची पूर्तता करता येणे शक्य होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आणि प्रत्येक
महाराष्ट्रीयन स्पर्धकाला हॉट सीटवर बसून, त्यांचे आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळणार आहे, यापेक्षा
वेगळा आनंदच असू शकत नाही.

या तिसर्‍या पर्वाद्वारे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला, हॉट-सीटच्या
माध्यमातून केवळ त्याच्या ध्येय किंवा स्वप्नपूर्तीच्याच दिशेने आम्ही घेऊन जाऊ, असे नव्हे, तर
त्यांच्यामधील गुणवत्तेला उत्तम संधी कशी मिळेल, हेही आम्ही पाहू. या कार्यक्रमाचा होस्ट बनून, त्यांचा
अधिक जवळचा मित्र बनून प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या आयुष्यातील यशाचा राजमार्ग दाखवण्याचा मी
नक्कीच प्रयत्न करेन.

कलर्स मराठीने आजवर नाविन्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झालेल्या अशा विविध
शैलीमधील दर्जेदार कार्यक्रम सातत्याने प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. नेहेमीच नाविन्याचा शोध घेत
असताना कलर्स मराठीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, ‘कोण होईल मराठी करोडपती –
पर्व ३’ च्या नव्या स्वरुपामध्ये जगात प्रथमच सोशल एंगेजमेंट चॅट लाईफलाईन “होऊ दे चर्चा” याची
सुरुवात केली आहे.

या समकालीन आणि अत्यंत नाविन्यपूर्ण लाईफलाईनमुळे या कार्यक्रमातला प्रेक्षकांचा
सहभाग आणि उत्कंठा, हे दोन्ही ही वाढणार आहे. आत्मविश्वास आणि दृढ निश्चय याबरोबर स्पर्धकांसाठी
असणार आहे तीन लाईफलाईन्स म्हणजेच आधार कार्डस – ज्या आहेत ‘मितवा, ‘डबल धमाका’आणि ‘चॅट
लाईफलाईन – होऊ दे चर्चा’यामुळे स्पर्धकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल
आणि त्यांच्यासाठी असीम आनंदाचे दरवाजे नक्कीच उघडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here