मित्रांनो! मागच्याच शुक्रवारी दुबईत झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 27 धावांनी हरवले. ‘कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या महिंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शुक्रवारी रात्री दुबईच्या इंटरनॅशनल मैदानात झालेल्या लढतीत चेन्नईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली.
सलामीवीर फाफ डू प्लेसिस याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने 3 गडी गमावून 192 धावा केल्या. यानंतर कोलकाताचा डाव 165 धावांवर रोखत चेन्नईने विजय मिळवला. चेन्नई चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जेतेपद पटकावण्याचा नवा इतिहास रचला आहे.
चेन्नईने सामना जिंकल्यावर धोनीसोबत धोनीच पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा ही देखील मैदानावर उपस्थित होते. सोशल मीडियावर या तिघांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे, या फोटोत धोनी, साक्षी आणि झिवा यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचे दृश्य दिसत आहे. मात्र चेन्नईच्या विजयासोबत धोनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाजी बातमी येत आहे,
याबाबत धोनी आणि साक्षीने अजून खुलासा केला नसला करी सुरेश रैनाची पत्नी प्रियंका हिने या बातमीला दुजोरा दिला आहे. धोनीच्या घरी नवीन चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली आहे, धोनीची पत्नी साक्षी सध्या गर्भवती असल्याचे प्रियांकाने सांगितले आहे, साधारणपणे २०२२ मध्ये धोनीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होईल.
Instagram वर ही पोस्ट पहा
यानंतर चेन्नईच्या खेळाडूंसह मैदानात उपस्थित असलेल्या धोनी, रैनाच्या बायकाही नाचू लागल्या. धोनीच्या पत्नीने मैदानात येत त्याला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. साक्षी धोनी विजयाचा आनंद साजरा करत असताना ती गर्भवती असल्याचे वाटत होते. चेन्नईने सामना जिंकल्यापासून धोनीच्या घरी पुन्हा पाळणार हलणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. सुरेश रैना याची पत्नी प्रियंका रैना हिने साक्षी धोनी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे म्हटले आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी 2022 मध्ये धोनी पुन्हा एकदा बाबा होणार आहे.
मित्रांनो! नुकतीच २० विश्वचषकासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. पण आता धोनीची ही निवड वादाचा विषय ठरली आहे. कारण याबाबत बीसीसीआयकडे आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट मंडळाचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे धोनीला मार्गदर्शक बनवल्यावर तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयने धोनीला संघाचे मार्गदर्शकपदी निवडताना काही नियमांचे उल्लंघन केल्याचे संजीव गुप्ता यांनी यावेळी सांगितले आहे.