ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो! मराठमोळा अभिनेता सुयश टिळक याला अभिनेत्री आयुषी भावेच्या नावाची हळद लागली आहे. या दोघांचे हळदीचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये दोघे सुंदर दिसत आहे. सुयशचे हळदीचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. सुयशचा आयुषीसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता.

सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. साखरपुड्यानंतर त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र लग्न कधी याचा खुलासा सुयशने केला नव्हता.

आता अचानक त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. सुयश आणि आयुषीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. कोरोनामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सुयश आणि आयुषीचा हळदीचा कार्यक्रम आज, 19 ऑक्टोबरला पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

सुयशने त्याच्या इन्स्टाला त्याच्या हळदीचे काही फोटो ठेवले आहेत. यामध्ये काही जवळचे मित्र व घऱची मंडळी दिसत आहे.सुयश 20 किंवा 21 तारखेला आयुषीसोबत लग्नगाठ बांधेल अशी चर्चा आहे.आद्याप या दोघांनीही लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र आज हळदीचा समारंभ झाल्याने उद्या किंवा परवा या दोघांचे लग्न असल्याची बोललं जात आहे.

शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांनी मागेच त्यांचा साखरपुडा उरकला होता. ” माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री” असं म्हणत अभिनेता सुयश टिळक ह्याने साखरपुड्याचे फोटोज सुद्धा शेअर केले होते. सुयश कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत काम केल्यानंतर खरोखरच त्याच शुभमंगल करत असल्याचं दिसून येतंय.

सुयशने ज्या मुलीसोबत साखरपुडा केलाय ती देखील एक मराठी अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आयुषी भावे आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता आम्ही अधिकृतरीत्या एकत्र आलो असून नवीन प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहोत असं सुयशने काही दिवसांपूर्वीच म्हटलं होत. त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आता आला असून त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याचं बराच काही सांगताना दिसतंय. या हळद सोहळ्यात मोजकीच माणसे उपस्थित असल्याचे दिसून येतेय. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या स्टार मराठीच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा…!!!