मित्रांनो! कोकण किनारपट्टीवर तसंच कोल्हापूर, सांगतलीत उसळलेल्या जलप्रलयात सामान्य जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त आणि मालमत्तेची हानी झाली असून या आपत्ती काळात पुरग्रस्तांसाठी विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे.
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अनेक भागात पाणी साचून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुराचे पाणी जरी ओसरले असले; तरी तेथील परिस्थिती अजूनही सुधारली नाही. या पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी जनजागृतीचं काम हाती घेतलं आहे. अनेक कलाकार आर्थिक मदत करताना दिसत आहेत.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नृत्यांगना दिपालीताई सय्यद यांनी देखील पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत जाहीर केली आहे. दरड कोसळलेल्या आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील लोकांना मदत करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत.
दिपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागातील रग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेत तिथल्या नुकसानीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेत ‘ हे सर्व भयंकर आहे. नागरिकांचं बोलणं ऐकूण अंगावर काटा येतोय. लोकांचे संसार उध्वस्त झालेत. काही उरलं नाहीए. माहित नाही देव अजून किती परिक्षा घेणार आहे’, अशा शब्दांत दिपाली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोकण हे फक्त सहली निमित्ताने फिरण्यासाठी नाही. आज तिथे आपल्या मदतीची खरी गरज आहे. शक्य असेल तितकी मदत करा,’ असे आवाहन भारत जाधव यांनी केले आहे. तर पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू राहावा यासाठी आता इतर मराठी कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे.
अभिनेते प्रवीण तरडे, भरत जाधव, हेमंत ढोमे, स्वप्निल जोशी, सुयश टिळक, उमेश कामत, दिग्दर्शक केदार शिंदे, रवी जाधव यांसह अभिनेत्री ऋतुजा देशमुख, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, सोनाली खरे, अभिज्ञा भावे, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांकडून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनीही टॉवेल, कपडे, चटई, चादरी यांची मदत पूरग्रस्तापर्यंत पोहोचवली आहे.
कोकण प्रांतातील परिस्थिती अत्यंत बिकट असून तिथल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने समाजमाध्यमांचा आधारे मदतीचा मार्ग खुला करून दिला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रसाद ओक यांनीही पुढचे आठ दिवस केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजमाध्यमांचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी देखील दिपाली सय्यद यांच्या संस्थेनं २०१९मध्ये आलेल्या पूरानंतक कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत केली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली होती. यासोबतच पूरपरिस्थितीचे संकट ओढावलेल्या पूरग्रस्तांच्या १००० मुलीच्या विवाहाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद फाऊंडेशननं घेतली होती.