दुर्गाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरारी
यशस्वी सिनेमाची निर्मितीमुल्य जाणून आणि प्रेक्षकांची अचुक नस ओळखून सिनेमा निर्माण करणारे निर्माते मराठी सिनेसृष्टीत अनेक आहेत. ज्यांचे सिनेमे अप्रतिम कलाकृती तसेच व्यवसायकितेचे उत्तम उदाहरण आहे. होली बेसिल आणि नवलखा आर्ट्स या दोन्ही मराठी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या संस्था आहेत. या दोन्ही निर्मितीसंस्थांनी आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत अनेक चांगले सिनेमे दिले आहेत.
‘फँड्री’, ‘सिद्धांत’ यांसारखे वेगळ्या विषयाच्या धाटणीचे सिनेमांची निर्मिती केली आहे. तर ‘अनुमती’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत.या निर्मितीसंस्थेचा सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘राक्षस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन निर्मात्यांपैकी होली बेसिलचे विवेक कजरिया यांनी दुर्गा या शॉर्ट फिल्ममधून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले. दुर्गा हे शीर्षक असलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये एका लहान मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. आपल्या प्रत्येक सिनेमातून अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर सादर करणारी वीणा जामकर या शॉर्ट फिल्ममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या शॉर्ट फिल्म मध्ये तिने एक बंगाली स्त्रीची भूमिका साकारली आहे. आजोबा आणि नातीचे भावविश्व तसेच गावातील एक कुशल मूर्तिकार ज्याची दुर्गा देवीवर अढळ श्रद्धा अशा व्यक्तीच्या जीवनाचा आढावा या लघुपटाच्या माध्यमातून घेतला आहे. कोरिया येथील बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये पहिल्यांदा झळकला.
त्यानंतर हा लघुपट १३ वा इंडियन फिल्म फेस्टिव्हल (स्टुटगर्ट २०१६), इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरला, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया ( टोरँटो), कायसेरी अल्टीन सिनार फिल्म फेस्टिव्हल (टर्की), ५ वा कोलकत्ता शॉटर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गार्डन स्टेट फिल्म फेस्टिव्हल (न्यु जर्सी), ६ वा अंटार्टिका शॉर्ट, डॉक्युमेंटरी अँड अनिमेशन फिल्म फेस्टिव्हल, (अंटार्टिका) यांसारख्या नामांकित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला आहे. या वर्षीचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार देखील या लघुपटाला मिळाला आहे.