मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण जाणतोच की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. राज कुंद्रा एक व्यावसायिक आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार राज कुंद्रा 2900 कोटींची संपत्तीचा मालक आहे. तो व शिल्पा अतिशय आलिशान आयुष्य जगतात.
राज कुंद्रा देशातच नाही तर सातासमुद्रापरही उद्योजक म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. भारतात मात्र राज कुंद्रा एक यशस्वी उद्योजकापेक्षा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती म्हणूनच जास्त ओळखला जातो.स्वत: राज कुंद्राने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी आज आयुष्यभर ऐशोआरामात आयुष्य जगू शकतो इतकं मी कमवलं आहे, लहान असताना पैशांसाठी संघर्ष पाहिला आहे.
त्यामुळे मोठे होवून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहिले होते असे राजने सांगितले होते. वयाच्या १८ व्या वर्षीच राजने पैसा कमावण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली होती. खिशात काही पैसे घेऊन राज सगळ्यांत आधी दुबईला गेला. हिरा व्यापा-यांची भेट घेतली, पण त्यातून काही राजला करिअरचा मार्ग मिळाला नाही. तेथून राजने नेपाळ गाठले, काही पारंपरिक शाल विकत घेतल्या आणि त्या यूके मधील काही ब्रांडेड स्टोअरमधून विकण्यास सुरुवात केली.
यात राजला चांगलेच यश मिळाले. यानंतर राज पुन्हा दुबईला हिऱ्याचा व्यवसाय करण्यासाठी गेला. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. हळूहळू त्याच्या कामात त्याला यश मिळत गेले आणि तो काम करत गेला. राज कुंद्रा विविध क्षेत्रांतील सुमारे 10 कंपन्यांचा मालक आहे . 2004 मध्ये ब्रिटीश मासिकाने श्रीमंत एशियन ब्रिटीशांच्या यादीत राज कुंद्राने 198 क्रमांकावर स्थान असल्याचे जाहीर केले होते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. राज कुंद्रा एक मोठा बिझनेसमन आहे आणि तो नेहमीच शिल्पाला महागडे गिफ्ट्स देत असतो. 20 कॅरेटच्या अंगठीपासून ते बुर्ज खलीफातील फ्लॅटपर्यंत राजने शिल्पाला अनेक महागडे गिफ्ट्स दिले आहेत.
शिल्पा शेट्टी नेहमीच आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसते. राज कुंद्राने साखरपुड्यात शिल्पाला 20 कॅरेटची डायमंड रिंग घातली होती. या अंगठीची किंमत तीन कोटी रुपयांच्या जवळपास आहे. शिल्पा शेट्टीला अनेव्हर्सरीनिमित्त राजकडून मोस्ट एक्सपेंसिव्ह गिफ्ट मिळाले होते. राजने पत्नी शिल्पाला दुबईतील बुर्ज खलीफातील 19वा फ्लॅट गिफ्ट केला होता. काही वृत्तांनुसार, 2016 मध्ये शिल्पाने अपली ही प्रॉपर्टी विकली. राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीसाठी आणखी एक महागडी प्रॉपर्टी विकत घेतली होती. त्याने यूकेमध्ये ‘राज महल’ नावाचा 7 बेडरूम असलेला एक आलीशान व्हिला विकत घेतला होता.
म्हटले जाते, की मुंबईत आपला एक सी-फेसिंग व्हिला असावा, असे शिल्पाचे स्वप्न होते आणि तिचे हे स्वप्न पती राज कुंद्राने पूर्ण केले. त्याचे कुटुंब बहुतेक वेळ याच ठिकाणी घालवते. त्यांच्या या सी-फेसिंग व्हिलाचे नाव ‘किनारा’ असे आहे. लक्झरी कार – राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला अनेक लक्झरी कार भेट म्हणून दिल्या आहेत. यात बीएमडब्ल्यू झेड 4 चाही समावेश आहे. शिल्पाची वाहनेही नेहमीच चर्चेत असतात. खासगी आयुष्यावर बोलायचे झाल्यास, राज आणि शिल्पा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. मुलाचे नाव वियान तर मुलीचे नाव समीशा, असे आहे. राज आणि शिल्पा सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात.