मित्रांनो!, टेलिव्हिजनवरील विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या दैनंदिन मालिका हा जणू आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच होऊन बसलाय. तो इतका की, या मालिकांमधील पात्रांशी आपण आपल्या घरातील सदस्यांसारखेच रिलेट करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर, सोनी सब वाहिनीवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बऱ्याच वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनांत एक हक्काचे स्थान राखून आहे.

आपण जाणतोच की, या शो मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकाणी बऱ्याच दिवसापासून या शो पासून दूर आहे. त्याचे कारणही तसे खासच आहे परंतु, या शो पासून दूर असली तर अभिनेत्री दिशा वकाणी नेहमी कोणत्या तरी विषयावरून सोशल मीडियामध्ये चर्चेत असते. तिचे चाहते दिशाच्या पुनरागमनची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर निर्मात्यांनीही तिची जागा अजूनही रिक्त ठेवली आहे. २०१७ साली मॅटरनिटी लीव्हवर गेल्यानंतर अद्याप ती या शो मध्ये परत दिसलेली नाही.

तारक मेहताच्या दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशाच्या खाजगी जीवनाबद्दल प्रत्येक लहान गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तिचे शो सोडण्यामागचे कारण म्हणजे तिने मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट मयूर पंड्याशी लग्न केले होते आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर दिशाने तिच्या एका मुलाखतीत बोलताना तिच्या विवाहित जीवनाबद्दल अनेक रहस्ये तिच्या चाहत्यांसाठी खुली केली होती, ज्यामध्ये तिने मयूरलाच आपले जीवनासाथी म्हणून का निवडले हे सुद्धा सांगितलं होत.

मयूर विषयी बोलताना दिशा म्हणाली होती की, “आम्ही कोणामार्फतही भेटलो नाही. आमच्यात काही गोष्टी कॉमन होत्या. ज्यामुळे आम्ही अचानक एकत्र आलो. सलग काही काळ भेटत राहिलो, आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझे मात्र मला नक्की कशा प्रकारचा जीवनसाथी हवाय हे पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होते.” तिच्या म्हणण्यानुसार वैवाहिक जीवनात संतुलन राखण्यासाठी आपल्याशी जुळणाऱ्या काही सवयी असलेल्या व्यक्ती नेहमी बरोबर असणे खूप महत्वाचे आहे.

जेव्हा दिशाचे पती मयूर पंड्या यांना एका मुलाखतीत विचारले गेले होते की, ‘तुम्ही दोघेही वेगवेगळ्या व्यवसायातून आलेले आहात, तर तुम्ही एकमेकांना लाइफ पार्टनर कसे ठरवले?’ यावर ते म्हणाले, ‘ज्या दिवशी मी दिशाला भेटलो होतो, तेव्हाच मी ठरवले होते की, आम्ही आमचे नातेसंबंध पुढे नेण्याचा पॉझिटिव्ह विचार करू. सुरुवातीला, आम्ही दोघांनाही एकमेकांना ओळखतही नव्हतो. म्हणूनच मी विचार केला की आम्ही प्रथम एकमेकांना थोडा वेळ देऊ आणि नंतर पुढचा विचार करू.

दिशा वाकाणी आणि मयूर पंड्या यांच्या नात्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी एकमेकांना जसे आहे तसे स्वीकारलेले आहे. दिशा फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, जिथे टाइम मॅनेजमेंट नसते हे मयूरला चांगलेच ठाऊक होते. त्याचवेळी दिशालाही माहिती होते कि मयूर पूर्णपणे व्यावसायीक व्यक्ती आहे.

प्रत्येक परिस्थितीत पती-पत्नी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हे त्यांच्या नात्याचा एक मजबूत दुवा मानला जातो. दिशा तिच्या करिअरमध्ये कितीही चांगले काम करत असली तरी लग्नानंतर तिने कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा समर्थपणे संभाळलेल्या आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी दिशाने तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले. परंतु आता एक गोंडस मुलगी जन्मल्यानंतर सध्यातरी ती आपल्या कुटुंबामध्ये पूर्णपणे व्यस्त आहे.