मित्रांनो!, आजवर आपण पाहत आलोय की, झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील दैनंदिन मालिकांनी नेहमीच रसिकांचे पुरेपूर मनोरंजन केलेलं आहे. कायमच या वाहिनीवरील मालिकांनी टीआरपीचे नव-नवे विक्रम रचलेले आपण पाहिलेत. आताच्या माझ्या नवऱ्याची बायको, लागीर झालं जी, तुला पाहते रे, तसेच जुन्या राधा ही बावरी, तू तिथ मी, या मालिका चांगल्याच हिट ठरल्या होत्या.
‘जय मल्हार’ सारखी पौराणिक आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सारखी ऐतिहासिक या पठडीतील मालिकांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या वाहिनीवर येणाऱ्या अनेक मालिकांनी, अज्ञात अशा नवोदित मराठी कलाकरांना एक नवी ओळख मिळवून दिली आहे. सा रे ग म प तसेच फु बाई फु, चला हवा येऊ द्या इ. सारखे क्वालिटी रियालिटी शो कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांची करमणूक करत आहेत.
या अशा रसिक मनाला भुरळ घालणाऱ्या मालिकांमुळे झी मराठीचा टीआरपी हा कायमच चढत्या क्रमाचा असतो. सध्या देखील झी मराठीवर काही मालिकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाची चांगलीच पकड घेतलेली आहे. येऊ कशी तशी मी नांदायाला, कारभारी लयभारी, माझा होशील ना, देवमाणूस, अग्गबाई सुनबाई, या मालिका सध्या चांगल्याच मनोरंजक वळणावर आहेत. परंतु मेडिया सूत्रानुसार याच मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याची व काहीतर लवकरात लवकर गुंडाळून पूर्ण करून मालिकाच बंद होणार असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे.
सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी लवकरच आता यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक, निवेदिता सराफ यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून लोकप्रियतेचा उच्चंक गाठला होता. तेजश्री प्रधानने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, निर्मात्यांनी याच मालिकेला कलाटणी देत ‘अग्गबाई सूनबाई’ नावाची मालिका नुकतीच काही महिन्यांपूर्वी सुरु केली.
या नवीन मालिकेची सुरुवातही चांगलीच दमदार झाली होती आणि मालिकेच्या पहिल्या भागाप्रमाणेच या मालिकेने देखील चांगलीच लोकप्रियता कमावली. आता कुठे मालिकेला काहीतरी वेगळं वळण मिळाल्याचं बघायला मिळत होते. मात्र आता मालिकाच बंद होणार असल्याचं चित्र समोर येत आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेचं पुढील नवं पर्व म्हणूनच ‘अग्गबाई सूनबाई’ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.
आणि आता अवघ्या चारच महिन्यात ही मालिका गुंडाळण्यात येत आहे. सासूबाई वर आधारित असं पाहिलं पर्व होतं तर दुसरं पर्व हे सूनबाई वर आधारित आहे. या दुसऱ्या पर्वात आसावरी म्हणजेच शुभ्राची सासू आपल्या मुलाच्या विरोधात जाऊन सत्याची म्हणजेच आपली सून शुभ्रा हिची साथ देत आहे असं दाखवण्यात आलं होतं.
आता ती शुभ्राला दगाबाज नवरा सोहमला सोडून जाण्यासाठी देखील मदत करत आहे, असं कथानक बघायला मिळत आहे. मात्र लवकरच मालिकेचं शूटिंग पूर्ण होणार असून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या महिना अखेरीस मालिकेचं सगळं चित्रीकरण पूर्ण होणार असून पुढील महिन्यात या लोकप्रिय मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असल्याची, शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता या मालिकेची कथा लवकरात लवकर पुढे सरकत असल्याचं दिसत आहे. तेव्हा शेवटी नक्की काय घडणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या मालिकेबरोबरच दुसरी अजून एक म्हणजेच देवमाणूस ही मालिकासुद्धा बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘देवमाणूस’ ही लोकप्रिय मालिका सध्या अखेरच्या टप्प्यात आली असल्याच सांगितलं जात होत पण आता या कथेने अजूनच रोमांचक वळणं घेतले आहे, म्हणून आताच या मालिकेला बंद करण्याचा निर्णय या लोकप्रिय मालिकेचे निर्माते घेतील असं चित्र सध्यातरी दिसत नाही.