मित्रांनो! काही प्रथितयश सोशल मीडिया चॅनल्सवरुन मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनतर सासरे अमिताभ बच्चंन यांनी सुनेची प्रतिमा वाचविण्यासाठी काय केले ते आपण माहीत करून घेणार आहोत.
स्वतः ढाल बनून त्यांनी सुनेची होणारी बदनामी वाचविण्यासाठी झुंज दिली होती. सिनेसृष्टीतील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना हे सर्व काही माहीत होते. त्यामुळे ऐश्वर्या रायला प्रचंड मदतच झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार घडले असे होते की २०११ मध्ये आलेल्या ‘हिरोईन’ या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत आली होती.
यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ऐश्वर्यावर आरोप केला होता की तिने आपली प्रेग्नन्सी लपविली आहे आणि मी गर्भवती आहे असे तिने मला अगोदर सांगितले नाही आणि तिने ही महत्त्वाची गोष्ट मला न सांगता बरेच दिवस माझ्या चित्रपटात अभिनय केला ज्याचा मला त्रास सहन करावा लागला.
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर पुढे म्हणाले की, ऐश्वर्याने ६५ दिवस शूट केले आहे आणि नंतर शेवटी ती म्हणाली की, मी हा चित्रपट करू शकणार नाही. आणि कारण न देता ती चित्रपट अर्धवटच सोडून गेली. त्यानंतर मला टीव्हीवरून माहित झाले की ती गर्भवती आहे. माहीत झाल्यानंतर मला काय करावे आणि काय नाही हेच सुचत नव्हते. जर ऐश्वर्या अगोदरच हे सगळं बोलली झाली असती तर मी तिला चित्रपटासाठी साइनच केले नसते.
बिग बी अमिताभ बच्चन सुनेची होणारी ही बेइज्जती सहन करु नाही शकले. आणि त्यांनी मधुरला उत्तर दिले की जेव्हा तुम्हाला माहित आहे की ऐश्वर्या विवाहित आहे. तर त्यावेळेस आपण चित्रपटात तिला साइन का केले? आणि चित्रपटाच्या दरम्यान काही नियम आहेत का नाही ? मुलाचा जन्म होऊ नये किंवा ती आई बनू नये असा काही नियम आहे काय ? असल्यास तो तुम्ही मला दाखवा.
अमिताभ पुढे म्हणाले की, इतकी वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर मला इतके तर नक्कीच माहित आहे की असा कोणताही नियम नाही. अनेक चित्रपटांमध्ये अशा वेळेस सीन शूट केलेले आहेत. त्यामुळे माझ्या सुनेची निष्कारण होणारी बदनामी थांबवा,अन्यथा..
मग काय?… बच्चनपुढे सर्व शांत बसले. विशेष म्हणजे ऐश्वर्याने चित्रपट सोडल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरला या चित्रपटात घेण्यात आले होते. परंतु तरीही हा चित्रपट काही जादू दाखवू शकला नाही. शेवटी तो पूर्णपणे फ्लॉपच झाला. असो…