तसं पहायला गेलं तर एखादा क्रिकेट खेळाडू आणि त्याच एखाद्या व्यक्तीसोबतचं प्रेमप्रकरण हे समीकरण कायमच प्रसारमाध्यमांमधे चर्चेत राहतं. मुळात आज आपण अशा एका विशेष विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जो विषय भारतीय क्रिकेटच्या नव्या दमाच्या खेळाडूच्या बाबींशी जोडला गेला आहे. आणि हा खेळाडू इतर कोणी नसून तो रिषभ पंत हा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे.
भारतीय क्रिकेट संघाला महेंद्रसिंग धोनीच्या नंतर त्याच्याइतका किंवा जवळपास कामगिरी करू शकेल असा खेळाडू अजूनतरी पुर्णत: भेटू शकलेला नाही. परंतु त्याची उणीव काही काळात रिषध पंत थोड्याफार प्रमाणात का होईना भरून काढू शकेल असा भारतीय प्रशिक्षक संघ आणि संघाच्या व्यवस्थापनाला विश्वास असल्या कारणाने रिषभ पंतवर एकप्रकारे चांगलीच जबाबदारी आलेली आहे.
मुळात पहायला गेलं तर आजवर रिषभ पंत याने त्याच्या कामगिरीची चांगली झलक ही वारंवार आयपीएलच्या सत्रांमधून दाखवली असली तरीदेखील जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा विचार येतो तेव्हा अजूनही त्याला बरचसं सिद्ध व्हावं लागणार आहे. रिषभ पंत त्याच्या फलंदाजीच्या आक्रमक शैलीसाठी खासकरून ओळखला जातो. १९९७ सालात रूरकी येथे जन्म झालेल्या या नवोदित खेळाडूने भारतीय क्रिकेट संघाला गाबाच्या मैदानावर जो महत्वपूर्ण कसोटी विजय मिळवून दिला होता तो कायम रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटला आहे.
आणि क्रिकेट रसिकांना आता त्याच्याकडून अशा अधिकाधिक उत्तम खेळाची अपेक्षा लागली आहे. मुळात आता ज्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे ती व्यक्ती आहे ईशा नेगी. ईशा नेगी हिला आता रिषभ पंत याची गर्लफ्रेंड म्हणूनच सध्या सर्व प्रसारमाध्यमांमधे व सोशल मीडियावर ओळखलं जातं आहे. अलीकडे तर त्या दोघांची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड रंगल्याची पहायला मिळते आहे.
रिषभ पंत जितका आक्रामक क्रिकेट खेळताना असतो तितकाच तो स्पष्ट आणि काहीसा अगदीच सरळमार्गी व्यक्तीमत्व असलेला दिसून येतो. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वत:च तो रिलेशनशीपमधे असल्याची कबुली दिल्याची सर्वांनीच पाहिली होती. आणि त्याच्या कबूलीनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. रिषभ पंत याने स्वत:हून ईशा नेगी हिच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर धमाकेदार कॅप्शन लिहिला होता.
खरतरं रिषभच्या कॅप्शन ने अनेकांना अगदी आनंदी वाटलं होतं. त्याने लिहलं होतं की, मी तुम्हाला आनंदी ठेवू ईच्छितो कारण मला तुम्हाला आनंदी पहायला आवडतं. त्याच्या पोस्टनंतर ईशा नेगी हिनेदेखील त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. आणि तिने म्हटलं होतं की, “माझ्या अगदी जवळचा व्यक्ती आणि माझ्या आयुष्यातलं प्रेम.”
तिने केलेल्या कॅप्शननंतर अनेक चाहत्यांनी रिषभ पंतला बरेच सारे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले होते. परंतु एकदा सारकाही बोलल्यानंतर कदाचित रिषभने हा विषय फारसा न सांगणं उचीत समजलं असावं. ईशा नेगी एक इंटेरियर डिझाईनर आणि तरुण इंटरप्रेनर आहे. तिचे अनेक फॅशन स्टाइल्स आणि इतर हटके लुक्स हे वारंवार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
ईशा नेगी एखाद्या बॉलिवुडमधील अभिनेत्रीपेक्षाही जबरदस्त सुंदर आणि हटके दिसते. ईशा नेगी आणि रिषभ पंत नेमके कशा पद्धतीने एकत्र आले? हे सांगणं सध्या थोडसं अवघड आहे. पण काहीही असलं तरी उर्वरित आयुष्यात रिषभ पंतला त्याच्या करियरचा फार मोठा टप्पा सर करावा लागणार आहे, हू निश्चित आहे. तर दुसरीकडे ईशा नेगी तिच्या करियरच्या दिशेने आधीपासूनच योग्यरित्या वाटचाल करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!