सिनेमा म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात. अनेक कधीकधी कलाकारांना बरचं काही गमवावं लागतं. अर्थात कधीकधी कुटुंबाला वेळ देता न किंवा इतर अडचणी उद्भवतात. अशाच प्रकारे कधी अभिनेत्रीच्या बाबतीत थेट प्रेग्नन्सी एखाद्या सिनेमाच्या मधात येऊन पडली तर? सिनेमाचं शुट थांबवावं लागलं तर? किंबहुना काही वेळा असंही घडलयं की सिनेमा पुन्हा रिशुट मोडवर टाकत नव्या अभिनेत्रीचा शोध घेऊन पुन्हा सिनेमा शुट करण्यात आला आहे.
अनेकदा काही ना काही अडथळे उ’द्भ’वू शकतात आणि सिनेमा निर्मात्यांच यात नुकसानदेखील होऊ शकतं. परंतु तुम्हाला वाचून कदाचित धक्का बसेल की काही ठराविक सिनेअभिनेत्रींनी चक्क पोटात बाळ असतानाही सिनेमाची शुटींग पुर्ण केली आहे. अर्थातचं ही बाब काही काल्पनिक नाही तर सत्यत्येत घडलेलीच आहे.
आणि शिवाय गरोदर राहून सिनेमा शुट पुर्ण करणारी हेमा मालिनी ही एकमेव अभिनेत्री नसून यासोबत इतर काही अभिनेत्रीदेखील आहेत ज्यांनी ही बाळाची आणि सिनेमाची जबाबदारी एकत्र सांभाळत सिनेमांना पुर्ण केलं आहे. यात करीना कपूर पासून ते जया बच्चन यांच्यापर्यंत काही खास अभिनेत्र्या आहेत ज्यांनी हे कठीण काम करून दाखवलं आहे.
त्या काळी हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या सट्टे पे सट्टा या सिनेमाच शुटींग सुरू होतं आणि नेमकचं हेमा मालिनी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिल्या होत्या. हेमा मालिनी यांनी या सिनेमात पोटात बाळ असूनही लवकरचं या सिनेमाचं शुट पूर्ण केलं. आणि सिनेमाची गोची होण्यापासून एकप्रकारे निर्मात्यांना वाचवलं. या सिनेमासाठी अनेक अभीनेत्रींनी नकार दिला होता, शेवटी अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार हेमा मालिनी यांनी हा सिनेमा करण्याच स्विकारलं. यावेळी हेमा मालिनी यांनी ईशा देओल हीला जन्म दिला होता.
खरतरं नुकतीच बाळ घरात घेऊन परतलेली सध्याची अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. करीना कपूर हिच्या दुसऱ्या बाळाबद्दल सोशल मीडियात बऱ्याच चर्चा रंगत असल्याच्या आपण पाहिल्या होत्या. मुळात खरतरं करीना प्रेग्नंट राहिली आणि लाल सिंग चढ्ढा या सिनेमाचं तिचं शुटिंग कोरोनामुळे राहून गेलं होतं. मग घाई करत करीनाने लवकरच दिल्लीमधे याच शुट आपल्या बेबी बंपसोबतच केलं. तिचे यावेळी सिन्स असे शुट करण्यात आले की, तिचा बेबी बंप हा लुक सिनेमात दिसून येऊ नये.
काजोल या अभिनेत्रीच्या पहिल्या बाळाचं दुर्दैवाने मिसकॅरेज झालं होतं. ती यावेळी “कभी खुशी कभी गम” या सिनेमाच्या शुटींगमधे व्यस्त होती. तिला तिच्या प्रेग्नंट असल्याची जाणीव होताच तिनेही शुट लवकर आटोपण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील तिला मिसकॅरेजचा सामना करावा लागला. त्यानंतर “वी आर फॅमिली” या सिनेमात काम केल्यानंतर तिच्या पोटी बाळाने जन्म घेतला. काजोलला कभी खुशी कभी गम यातील भुमिकेकरता जगभरातून फार तारीफ मिळाली होती.
पुढची बात आहे ती म्हणजे, डान्सिंग क्वीन अभिनेत्री माधुरी दीक्षितची. माधुरीने थेट चक्क देवदास सारख्या मोठ्या उत्कृष्ट चित्रपटाची शुटींग पोटात बाळ घेऊन केली होती. मुळात हरा रंग डाला या गाण्याच्या शुटवेळी तर ती चक्क तीन महिन्यांची गर्भवती राहिली होती. माधुरी दिक्षितची आजवरची कारकिर्द पाहता तुम्ही जाणूच शकता ती तिच्या कामाबद्दल आणि इतर जबाबदाऱ्यांबद्दलदेखील किती जागरूक आहे. पुर्ण शुटींग झाल्यानंतर माधुरीने यावेळी तिच्या पहिल्या बाळाला जन्माला घातलं होतं.
झंकार बीट्स या सिनेमाच्या वेळी जुही चावला प्रेग्नंट राहिली होती. तिने हा चित्रपट शुट करताना बरीच मेहनत घेतली होती, तिला यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीदेखील खंबीरपणे स्वत:ला सावरत जुहीने स्वत:तील दुहेरी भुमिका ठामपणे पार पाडून आपल्या बाळाला नंतर जन्म दिला.
अभिनेत्री जया बच्चन या तर शोले या चित्रपटाच्या वेळी दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिल्या होत्या. त्यांनीही यावेळी शुट दरम्यान प्रेग्नंट असताना आपलं काम यशस्वीरित्या पार पाडलं होतं. यावेळी त्यांनी अभिषेकला जन्म दिला होता. आणि बच्चन कुटुंबात हर्षोल्लास पसरला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!