वहिणीसाहेब अर्थात धनश्री काडगावकरच्या बाळाचे फोटोज होतायेत सोशल मीडियावर व्हायरलं, पहा तिच्या गोंडस बाळाचे फोटो. संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीला उतरलेली भुमिका म्हणजे, वहिनीसाहेब. अर्थातच “तुझ्यात जीव रंगला” या झी मराठीच्या मालिकेत “नंदिता” या पात्राची नकारात्मक लहेजाची भुमिका ज्या अभिनेत्रीने बखुबी साकारली ती अभिनेत्री आहे धनश्री काडगावकर. धनश्रीला या मालिकेत सहसा वहिनीसाहेब नावाने ओळखलं जातं.
एक वेगळा साज, अदब आणि आपला दबदबा कायम लोकांमधे पहायला आवडणाऱ्या स्वरूपाची ही भुमिका. या भुमिकेला अगदीच तरबेजपणे नकारात्मकतेचा लहेजा चढवत धनश्री काडगावकरने खऱ्या अर्थानं आपल्या अभिनयाच्या कौशल्याची पावती रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवली. आता खास आणि जबरदस्त बातमी म्हणजे, धनश्रीला पुत्रप्राप्ती झाल्याच सर्वांना माहितच आहे.
धनश्रीच्या घरी काही दिवसांपूर्वीच नव्या बाळाचं आगमन झालं असल्याच पहायला मिळालं आहे. धनश्रीच्या घरी नव्या बाळाचं आगमन झाल्याची बातमी तिनेच इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली होती. आणि आता त्या बाळाचे फोटो तिने पहिल्यांदाच शेअर केले आहेत.
या फोटोंवर रसिकप्रेक्षकांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मुळात हे फोटो सोशल मीडियावर अनेकांकडून व्हायरल होत असल्याचंही पहायला मिळालं आहे. धनश्री काडगावकर हिने फोटो शेअर केल्यावर आपला आई झाल्याचा आनंद किती जास्त आहे, याचीही प्रचिती सर्वांना दिली आहे. धनश्री एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. शिवाय तिच्या गोंडस बाळाचे फोटो पाहून चाहत्यांमधे एक वेगळाच उत्साह दाटून आल्याच पहायला मिळालं आहे.
धनश्री काडगावकर हिने खऱ्या अर्थानं तिचं आई होणं फार एन्जाॅय केलं आहे. तिच्या हरएक पोस्टमधून ती तिचा हरएक आनंदाचा क्षण, गोष्ट इतरांसमोर मांडत असते. याआधी धनश्रीच्या घरी नवा पाहुना येणार ही चाहूल तेव्हाच सर्वांना लागली होती जेव्हा तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, “कुणीतरी येणार गं” अशा कॅप्शनसहीत एक पोस्ट अपलोड केली होती.
यातही एक विशेष बाब ही की या पोस्टला तिने थेट तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी शेअर केलं होतं. धनश्री काडगावकर जितकं तिच्या मालिकेवर, तिच्या कामावर प्रेम करते तितकचं ती आपल्या कुटुंबियांवरदेखील करते. ती स्वत:च्या कुटुंबालाही तितकाच वेळ देते, घरातल्या प्रत्येकासोबत महत्वाचा वेळ देणं गरजेच असतं ही गोष्ट ती चांगल्याच प्रकारे जाणते. दुर्वेश देशमुख हा धनश्रीचा नवरा आहे. खरतरं तो एक पुणेकर आहे असं म्हणता येईल, शिवाय तो एक इंजीनिअर आहे.
धनश्री काडगावकर या अभिनेत्रीने आतापर्यंत मराठी नाटकांमधून काम करत आपली ओळख बनवली आहे. धनश्री तसं पाहता आज मराठीत एक नव्याने फॅशन अथवा ट्रेण्ड सेट करणारी अभिनेत्री झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याआधी धनश्रीचे बेबी बंप, तिच्या वर्कआउटचे, किंवा तिच्या विविध गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओज शेअर होऊन व्हायरल व्हायचे.
परंतु सध्यातरी सर्वत्र एकच गाजावाजा रंगला आहे. तो म्हणजे तिच्या बाळाच्या फोटोंबाबत. धनश्रीने मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक कामे केलेली आपल्याला पहायला मिळतात. त्यामधे चिठ्ठी हा मराठी सिनेमा असेल किंबहुना “गंध फुलांचा गेला सांगुनी” ही मालिका असेल. तिने तिच्या भुमिकांना वेगळ्याच लहेजात नेऊन वठवलं आहे, हे निश्चित. धनश्रीच्या या मालिकेला त्यावेळी चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
सध्याच्या घडीला धनश्रीच्या अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीसाहेबांच्या घरी एक बाळ आलं असल्याने, धनश्री अत्यंत आनंदी आहे. धनश्रीने या बाळाचा आपल्या वडीलांसोबतचा एक फोटोही इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ती यात म्हणते, बाळाचे वडील एकाचवेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत. अर्थातच एक जॉब आणि दुसरा बाळाचा सांभाळ.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!