लोकांना स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात, 18 वर्षीय तरूणाने एक जगावेगळा इतिहास घडविला आहे. या तरूणाने आधार नावाची जेनेरिक कंपनी सुरू करून लोकांना जेनेरिक औषध देण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे.
मुंबईतील ठाणे शहरात राहणारा 18 वर्षांचा अर्जुन देशपांडे, बारावीत शिकतो; पण शिक्षणाबरोबरच या तरूणाने एक कंपनी उभारली आहे, जी लोकांना परवडणारी औषधे पुरवित आहे.
कारण सध्याच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना यातून थोडा फार यरी मोकळा श्वास मिळणार आहे.
ध्येयवादी तरुण म्हणतो, आईकडून या क्षेत्रात काम करण्याची कल्पना मला मिळाली..
अर्जुनला प्रत्यक्षात या क्षेत्रात काम करण्याची कल्पना त्याच्या आईकडून मिळाली आहे. त्याची आई फार्मा कंपनीत आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधांचे वितरण पाहत आहे. ज्यामुळे अशी संकल्पना साकार होऊ शकते, असं त्याला त्याच्या आईने सुचवलं.
अर्जुनची आई फार्मा कंपनीच्या कामा संबंधात परदेश दौर्यावर जात असते. जेव्हा जेव्हा ती अर्जुनला घेऊन जायची तेव्हा तो खूप काळजीपूर्वक ऐकत असे आणि काम समजून घेत असे. या कल्पनांच्या आधारे त्यांनी जेनेरिक आधार नावाची कंपनी सुरू केली.
रतन टाटा यांनीही मदतीचा हात पुढे केला..
अर्जुनाची आई सांगते की, 18 वर्षांच्या मुलाचे मुंबईजवळ ठाणे शहरात कार्यालय आहे. त्याने देशातील जवळपास 100 शहरांमध्ये आपली जेनेरिक आधार स्टोअर्स उघडली आहेत आणि तो लोकांना असा किफायतशीर औषधे देईल असा त्याचा हेतू आहे आणि त्याच्या कार्यामुळे लोकांना रोजगारही मिळत आहे.
चार शहरांतून सुरू झालेले हे काम आता सुमारे 100 शहरांमध्ये पसरले आहे. या फार्मा स्टार्टअप कंपनीबरोबरच उद्योगपती रतन टाटा यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.