‘गुरू ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा!’ म्हणजेच गुरूमध्ये विश्वनिर्माता ब्रह्मा, सृष्टी चालवणारा विष्णू आणि विनाशक शिव यांचा संगम आहे. या श्लोकाचा आणखी एक अर्थ होतो, ‘गुरू सर्वश्रेष्ठ आहे आणि मी मनापासून त्यांचा आदर करतो.’ ५ जुलै रोजी साजरी करण्यात येणारी गुरूपौर्णिमा हा पारंपारिक उत्सव आहे. या दिवशी गुरूंचा आदर व प्रार्थना केली जाते आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा दिवस अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी यंदा ‘गुरू पौर्णिमा’निमित्त शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांचे स्मरण करूया, ज्यांनी सर्वश्रेष्ठ नेता डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यांना त्यांचे आडनाव ‘आंबेडकर’ देखील दिले.
असे म्हटले जाते की, शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यामध्ये अग्रस्थानी असतात. मुलांप्रती नि:स्वार्थ प्रेम व प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात काहीच शिक्षक खरी भावना, काळजी व चिंता व्यक्त करतात. बाबासाहेबांच्या जीवनात देखील अशाप्रकारचे प्रेरणादायी व निश्चयी शिक्षक होते, ते म्हणजे त्यांचे गुरूजी ‘कृष्णा केशव आंबेडकर’. वर्ष १८०० मध्ये भारत नवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करत होता आणि या काळादरम्यान बाबासाहेबांना शाळेत अत्यंत आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागला. शालेय अधिकारी व शिक्षकांनी त्यांना दुजाभावाची वागणूक दिली. दुजाभाव, दिली जाणारी वागणूक आणि बाबासाहेबांच्या प्रगतीसाठी असमर्थ ठरत असल्याने त्यांच्या गुरूजींनी धाडसी पाउल उचलले आणि जातीय वादामधून बाहरे पडण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना त्यांचे आडनाव ‘आंबेडकर’ दिले.
भीमराव रामजी सकपाळ म्हणून जन्माला आलेले बाबासाहेब यांचे त्यांचे वडिल रामजी यांनी शाळेमध्ये भीमराव आंबाडवेकर असे नाव नोंदवले. हे आडनाव रत्नागिरी जिल्ह्यामधील त्यांचे मूळगाव ‘आंबाडवे’वरून ठेवण्यात आले. पण शाळेमधील त्यांचे गुरूजी कृष्णा केशव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव बाबासाहेबांना दिल्यामुळे ते भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जातात.
बाबासाहेबांच्या शिक्षकांनी त्यांच्या जीवनात दिलेल्या लक्षणीय योगदानाबाबत बोलताना एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर’मध्ये रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, ”गुरू म्हणून ओळखले जाणारे शिक्षक तुम्हाला जीवनातील विविध पैलूंचा सामना करण्यासाठी सुसज्ज करतात. बाबासाहेब त्यांचे गुरूजी म्हणून कृष्णा केशव आंबेडकर असल्यामुळे खूपच भाग्यवान होते. त्यांनी बाबासाहेबांची असलेली क्षमता ओळखली आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन केले. बाबासाहेब महत्त्वाकांक्षी होते आणि त्यांच्यामध्ये शिकण्याची भूक होती. सहकारी विद्यार्थ्यांकडून दुजाभावासारखी वागणूक दिली जात असताना देखील बाबासाहेबांनी प्रामाणिकपणे व समर्पिततेसह अभ्यास केला. बाबासाहेबांची शिक्षणाप्रती असलेली बुद्धी व भूक अधिक वाढवत त्यांचे गुरूजी कृष्णा केशव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव ‘आंबेडकर’ असे बदलले.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर’ ही बाबासाहेबांचा वयाच्या पाचव्या वर्षांपासून ते भारतीय संविधानाचे शिल्पकार बनण्यापर्यंत प्रवास सांगणारी प्रेरक कथा आहे.
पाहा ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर’चे नवीन एपिसोड्स १३ जुलै २०२० पासून रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!