आमिर खान व करिश्मा कपूर ही हिट जोडी म्हटलं की एकच चित्रपट समोर येतो, तो म्हणजे “राजा हिंदुस्तानी”. आणि अशा वेळी हमखास आठवतं ते गाजलेल अप्रतिम गाणं “परदेसी परदेसी”. आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल की, एवढ्या हीट गाण्यातील अभिनेत्री सध्या कुठे आहे. मुळात आजच्या घडीला काही जणांना या दिलखेच गाण्यातील अभिनेत्रीचं नावच माहित नाही.
या गाण्यात आमिर दोन अभिनेत्रींसोबत थिरकताना दिसतो त्यातील बंजारण भुमिकेत आहेत त्या “कल्पना अय्यर”. काही काळ कल्पना अय्यर यांची परदेसी गाण्याची जादू कायम प्रेक्षकांवर राहिली होती, याबाबत शंका नाही. अमरोहा येथे जन्माला आलेल्या या कल्पना यांनी सुरूवात माॅडेलिंगपासून केली.
मिस वर्ल्ड स्पर्धेत पेजेंट येथे त्या भारताच प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकमेव अभिनेत्री होत्या. येथे टॉप पंधरामधे येऊन त्यांनी बाॅलिवूडला आपली दखल घ्यायला आवर्जून भाग पाडलं. चित्रपटातील आयटम नंबर्सना त्यांनी मोलाच स्थान मिळावून दिलं.
कोई यहां नाचे, मुझे जान से भी प्यारा है, परदेसी अशा गाण्यांनी तर नवीन रेकाॅर्डचं प्रस्थापित केले. दिसायला आकर्षक व सेक्शुअल अभिनेत्री याव्यतिरिक्त त्यांनी एक पाॅप-सिंगर अशी स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली होती.
फरमान, चंद्रकांता अशा टेलीव्हिजनवरील मालिकांमधेही कल्पना अय्यर यांनी भुमिका निभावल्या. नाही म्हटलं तरी जवळपास १०० चित्रपटांमधे त्यांनी काम केल. त्यांनी बऱ्याच चित्रपटात सपोर्टींग रोल सोबतच पाहुण्या कलाकाराचीही भुमिका केली आहे.
१७ एप्रिल १९५५ साली त्यांचा जन्म झाला. त्या गायिका, मोडेल व अभिनेत्री म्हणून पुढे प्रकाशझोतात येऊ लागल्या. १९८० ते १९९० दरम्यान हिंदी चित्रपटांचा दशकाचा जो काळ होता त्या काळात त्यांनी बऱ्याच हिंदी सिनेमांना स्वत:च्या कार्याची प्रचिती दिली.
काही काळ कल्पना अय्यर यांच अफेअर अजमद खान यांसोबत असल्याच्या बातम्यादेखील बऱ्याच रंगत होत्या. परंतु पुढे काय झालं कोणालाही ठाऊक नाही. सध्या कल्पना अय्यर यांच लग्न जरी झालेल नसलं तरी त्यांनी वयाच्या वृद्धापकाळ टप्यात असताना कबुली दिली की, “लग्न न करणं” ही माझ्याकरता एक खंत मनात राहिल.
कल्पना अय्यर यांना खास लक्षात ठेवलं गेल ते; आपस की बात, राजा हिंदुस्तानी, लाडला या चित्रपटांसाठी. घर-परिवारात करूणा व कल्पना या दोघी बहिणी व एक भाऊ रवी, असा परिवार होता. सध्यामात्र कल्पना या दुबई येथे राहत आहेत.
त्यांनी बराच काळ आता चित्रपट वा इतर प्रसारमाध्यमांपासून दूर रहायचं ठरवल असल्याच समजलं आहे. आजही त्या अविवाहित असून हम साथ साथ है या चित्रपटानंतरपासून दुबईतच कायमच्या वास्तव्यास गेल्या. कल्पना अय्यर सध्या तिथे रेस्टॉरंट चालवतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.