सोशल मीडियावर राजकारणातला म्होरक्या,क्रीडा क्षेत्रातला म्होरक्या,कला क्षेत्रातला म्होरक्या,आखाड्यातला म्होरक्या अशा विविध क्षेत्रांतल्या म्होरक्यांचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसताहेत. अशा आकर्षक पोस्टच्या माध्यमातून म्होरक्या सिनेमाच्या चर्चेला उधाण येताना आपल्याला दिसत आहे. मोशन पोस्टर,पोस्टर, विविध फोटो यातून प्रेक्षकांमध्ये ‘म्होरक्या’ सिनेमाबद्दल उत्सुकता वाढतांना आपल्याला बघायला मिळतंय.त्यात आणखी एक लक्ष्यवेधी बाब म्हणजे नुकतंच रिलीज करण्यात आलेलं ‘म्होरक्या’ सिनेमाचं टायटल सॉंग. म्होरक्याचं टायटल सॉग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
मंडळी, नावातच रुबाब,दम असणाऱ्या ‘म्होरक्या’ सिनेमाचं टायटल सॉंगही रुबाबदार तयार झालं आहे बरं का. ह्या टायटल सॉंगला आनंद शिंदे यांनी. काळजाचा ठाव घेणार अस हे गाणं झालं आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही. मातीतला स्वाभिमान जागा करेल इतक्या ताकदीचा गाणं संगीतबद्ध झालं आहे. एकंदरीत कोण असतो म्होरक्या, म्होरक्या म्हणजे कोण,म्होरक्या का पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गाण्यातील शब्द देतात. गाण्यातील प्रत्येक शब्द हा हृदयस्पर्शी असा आहे. मातीची शान दाखवणारा आहे. मातीतल्या वास्तवावर भाष्य करणारं अस हे गाणं आहे. गाण्यातील प्रत्येक शब्द हा गावाकडच्या मातीतल्या संवेदना जिवंत करणारा आहे.
आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट. लोकसंगीताचा म्होरक्या आनंद शिंदे यांनी आजवर लोकगीतं, भीमगीतं, विविध प्रकारची गाणी गायली मात्र, ह्या सिनेमात आनंद शिंदे यांनी रॅप सॉंग गायलं आहे ही ह्या गाण्याची जमेची बाजू. आनंद शिंदे यांचा एक वेगळा अंदाज ह्या गाण्यातून तमाम महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आनंद शिंदे यांच्या आवाजातील पहाडी,तडफदार,मराठमोळा,गावरान बाज असणारा अस्सल मातीतला ‘रॅप’ ऐकायला मिळणार आहे. आनंद शिंदे यांनी हे गाणं गाण्यासाठी आव्हान समोर होतं असं सांगितलं मात्र अतिशय सुंदर पध्द्तीने त्यांनी हे गाणं गायलं आहे.
एकंदरीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अमर देवकर यांच्या म्होरक्याची चर्चा ही गाणं वाढवणार यात शंका नाही.
यापूर्वी गाण्यात कधी न ऐकलेले मात्र माहीत असलेले शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मातीतल्या शब्दांची ह्या गाण्यासाठी गीतरचना केली आहे वैभव शिरोळे, कुणाल गायकवाड, अथर्व सातभाई यांनी. चालीनं आणि संगीतानं हे गाणं नक्कीच मनात घर करून जातं. ह्या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे वैभव शिरोळे यांनी. व्यंकटेश राजमोगली पडळ, आणि युवराज कोंडीबा सरवदे निर्मित, अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’हा सिनेमा २४ जानेवारीला तुमच्या जवळच्या थेटरमध्ये बघायला विसरू नका…
Song Link