नवा जन्म …. नवी जिद्द …. एका बॅंकेत दबक्या आवाजात , पोरी हे पैसै जरा मला भरून देशील का ? अशी विचारणा करणारी ह्या 71 वर्षांची आई मला भेटली …. तिने सांगितल्या प्रमाणे तिचे स्लिप भरण्यास मी सुरुवात करताच या थकलेल्या आईच्या चेहर्यावर एका गोड निखळ व स्मितहास्य मला दिसले ते पाहून खूप छान वाटले पण थोडी उत्सुकताही वाटली , की हे काय ? न रहावल गेल्यामुळे या आईला सहज विचारलं , या गोड हास्य मागच कारण काय ?
ऊत्तर ऐकल्यावर आणि पासबूक पाहिल्यावर माझ्या हातातलं पेन काही लिहेनास झाला …. डोळे चटकन पाणावले …. आई या नावात सहन करण्याची किती विलक्षण ताकद असते हे ज्वलंत उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर धगधगत उभ पाहिल ….
या आईचे नाव आहे आशा ताई …. खूप वर्षांपूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलीचे आनंदाने लग्न सोहळा पार पाडला … काही वर्षांनंतर या आशा ताईंचे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे यजमान देवाघरी गेले आणि आशा ताईंनच्या आयुष्याला आर्थिक व शारीरिक परिस्थितीची गळती लागली आणि आशा ताई उतरत्या वयात धुनी भांडी करू लागली …. कुठेतरी एकटी सावरत असतानाच दुर्दैवाने अचानक तिला दुसरा झटका बसला तो म्हणजे तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचा …. अचानक तीच्या मुलीचेही यजमान देवाघरी गेल्याचा निरोप या आईला कळला …. पण हा दूसरा झटका मात्र आशा ताईंना काही पचेनासा होता , कारण त्या धक्क्यामूळे तिच्या मुलीच्या मेंदूचा रक्तपुरवठा 90% पेक्षा कमी झाला होता व तीची मुलगी आता काही बोलवेनाशी व कळेनाशी वागू लागली आणि तीचे शरीर अगदी लहान मुला प्रमाणे हाल चाल करू लागले ….
ऐकट्या आईच्या उतरत्या वयात आपल काळजी घेणारी मुलगी जेंव्हा दुर्दैवाने स्वतःच लहान मुल होऊन आपल्या आई समोर येत तेव्हा या आईच्या काळजाचे काय हाल झाले असतील हे त्या माऊलीलाच माहित ….या आईच्या डोळ्यासमोर जरी भयानक अंधार पसरला होता पण त्याच बरोबर आपल्या काळजाच्या तुकड्याची यापुढची महत्त्वपूर्ण जवाबदारीही स्पष्ट दिसत होती ….
सुन्न झालेल्या ह्या आईच्या मनात काही क्षणातच * आज आपल्या लेकीचा नवा जन्म झाला आहे* असा दैविक विचार आला आणि आज पासून पुन्हा एकदा आपण तीचे आई बाबा होऊयात असे वाटू लागले व अश्या परिस्थितीत लेकी समोर आपण लहान मुलं होऊन , लाचार व हतबल होऊन कस चालेल ? तिला आपण आता बर करण्याचा पुरेपुर प्रयत्न करूयात या जिद्दीने या आईची वाटचाल सुरू झाली
आता मला जगण्यासाठी एक नवी उम्मेदही मिळाली आहे असेही या आई पुढे म्हणाल्या …. नतमस्तक झाले मी या माऊली पुढे आणि त्या क्षणा पासून 2 महिन्यातून एकदा का होईना न चुकता आपल्या कमवलेल्या 2000/- पगारातून मुलीच्या नावाने 50/- रू ही आई नेहमी बँकेत जमा करत …. आपली मुलगी उद्या बरी होईल व हे पैसे तिच्या कामाला येतील ही जबरदस्त इच्छाशक्ती ….
म्हणून तीच्या मुलीचे स्लिप कोणीही भरून देताना तिला आनंद होत …. आणि 2 वर्षात मुलीच्या खात्यात 1700 रू फक्त , फक्त हे जरी आपल्या साठी असतील तरीही ते ह्या आईसाठी तीच्या महिन्याभराचा पगार जमा होत होता व ही खुप मोठी गोष्ट असते हे मला शिक्षण्यास मिळाल …. किती हा आनंद किती हा समाधान…. ना कसली भूक , ना कसला हव्यास ना आयुष्याकडे कसली तक्रार ….
या आईच्या चेहर्यावरचा हा विलक्षण आनंद व समाधान मला व माझ्या सारख्या कितेक स्लिप भरत असलेल्यांना धन्यवाद असावा …
शालेय पुस्तकी परिक्षेत अशिक्षीत असुनही आयुष्याच्या खर्या परिक्षेत ही आई खरी उतरत असावी …. खचून न जाता , आपल्या मुलीला टाकून न देता जिद्दीने व समाधानाने पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करत आहे ही आई ….
जगायचे कसे हे धड्डे गिरवत असताना मलाही नव्याने खुप काही शिकवून गेली आई ….
Credit : Journalist – Asmita Puranik