फुलपाखरू मध्ये वाईट प्रवृत्तींचे ‘ रावण दहन ‘
मराठी संस्कृती प्रमाणे , दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊदिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेलेअसते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात. प्रभुश्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला त्यामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.. पूर्वीच्या काळात चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टीवर होणारी कुरघोडी दाखवण्यासाठी वर्षोनवर्षे रावण दहनाची गोष्ट सांगितली जाते . सध्या नवरात्र सुरु आहे. त्याचप्रमाणे फुलपाखरू मालिके मध्ये सुद्धा नवरात्र आणि दांडिया गरबा यांची मजा दाखवण्यात आली. दसऱ्याचा विशेष भागात फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेहीसकट कॉलेजमधील सर्व मित्र मंडळी वाईट प्रवृत्तीचे दहन दसऱ्याच्या दिवशी ‘रावण दहन’ करून करणारआहेत.
फुलपाखरू या मालिकेत या ‘रावण दहन’या विशेष भागात, एक १५ फुटी रावण बनवला आहे . ह्या रावणाच्या प्रत्येक शिराखाली बलात्कार, स्त्रीभूण हत्या, विनयभंग , अल्पवयीन मुलींवर अत्याचार , व्यसनाधीनता , बाल कामगार , भ्रष्टाचार , फसवणूक , गुंडगिरी , वृद्धांचा अपमान समाजातील वाईट प्रवृत्तींबद्दल लिहिलेअसून ,कॉलेज मधील सर्वच मुले देशाचे सिटीझन म्हणून ह्या सर्व प्रवृत्ती नष्ट करायला हातभार लावण्याचे रेसोलुशन करतात . सध्या फुलपाखरू या मालिकेनेतरुणाईच्या हृदयात घर केले असून मानस आणि वैदेही यांचे लाखोंनी चाहते झाले आहेत. कॉलेज जीवनातील मानस म्हणजेच यशोमन आपटे आणि वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे यांचे निरागस प्रेम दाखवणारी ‘फुलपाखरू’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी युवावर प्रदर्शित होते.