झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होणारा ” युवा डान्सिंग क्वीन” या कार्यक्रमात सध्या नृत्याचे प्रयोगावर प्रयोग होत आहेत. ओंकार शिंदे हा या कार्यक्रमाचा नृत्यदिग्दर्शक आहे त्याचबरोबर या कार्यक्रमात तो स्पर्धकांचा मेंटॉर सुद्धा आहे . निरनिराळे विषय आणि थीम घेत प्रत्येक स्पर्धक निरनिराळे परफॉर्मन्स देत आहेत .सध्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर लोकप्रिय झाला आहे . या आठवड्यामध्ये झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेची संपूर्ण टीम पाहुणे कलाकार म्हणून युवा डान्सिंग क्वीनच्या व्यासपीठावर आलेले होते .या व्यासपीठावर त्यांनी भरपूर मजा केली . त्याचबरोबर त्यांना युवा डान्सिंग क्वीनच्या व्यासपीठावर दोन चार्ली चॅप्लिन पहायला मिळाले .

खरं तर क्षमा देशपांडे ह्या स्पर्धकाने चार्ली चॅप्लिन हे जगभरातील लोकप्रिय पात्र मराठी गाण्यावर कसे परफॉर्मन्स देईल आणि त्या गाण्यातून सुद्धा प्रेक्षकांना कसे हसवता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला . गाणं होत ” मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची ” गीतरचना शांताराम आठवले आणि संगीत केशवराव भोळे यांचे अतिशय जुने गाणे पण या गाण्यावरील क्षमा चा परफॉर्मन्स अतिशय लक्षणीय आणि खूप मनोरंजन करणारा होता . सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य या दोघांनीही तिला तिच्या परफॉर्मन्ससाठी गिफ्ट दिले . क्षमा ही पहिली चार्ली चॅप्लिन होती तर या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत दादरकर याने अभिनेत्री गायत्री दातार हिला दुसरी चार्ली चॅप्लिन बनवले . परफॉर्मन्स झाल्यावर अद्वैत ने गायत्री ला व्यासपीठावर बोलावून तिला चार्ली चॅप्लिन सारखे चालून दाखवण्यास सांगितले . जे खरंच खूप मजेशीर होते .

युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम दार बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावर पहायला मिळतो .