झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय . अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. या कार्यक्रमात सुरवातीला १४ सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक होत्या मात्र स्पर्धेच्या स्वरूपातील या कार्यक्रमात आता त्यातील केवळ ९ डान्सर स्पर्धक राहिल्या आहेत. युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवावर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता पहायला मिळतो. या कार्यक्रमाचे जज लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत . फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना त्यामुळे प्रेम रस घेऊन सगळे स्पर्धक त्यांचे निरनिराळे परफॉर्मन्स सादर करत आहेत . शिकारी आणि झी ५ वरील काळे धंदे या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खान ने तिच्या हॉट अंदाजामध्ये प्रेमरस दाखवला.

स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी वर चित्रित झालेलं आणि स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं लाल इश्क या मराठी चित्रपटातील ” चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला” हे अतिशय सुंदर असे प्रेमी युगलांवरील प्रेमगीत नेहा खान हिने अतिशय सुंदरतेने तिच्या हॉट अंदाजामध्ये सादर केले.या गाण्याची कोरिओग्राफ़ी ओंकार शिंदे याने एवढी उत्तम केलेली की युवा डान्सिंग क्वीन चे दोन्ही जजेस मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी हरवून गेले दोघांनाही हा नेहाचा गाण्यामधील अभिनय आणि पूर्ण डान्स परफॉर्मन्स खूपचं आवडला आणि तिने या आधी असा परफॉर्मन्स का नाही केला असाही प्रश्न विचारला . नेहा खान ही आजवर तिच्या हॉट सीन्स मुळेच प्रसिद्ध आहे मात्र त्याबरोबर ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका आहे हे तिने या परफॉर्मन्स मधून दाखवून दिले .