आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम ते घेऊन आले. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. हा कार्यक्रम वेगवेगळ्या रंजक व्हिडीओजच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे भरपूर मनोरंजन करतोय. तसंच निलेश साबळे यांचा VJ म्हणजेच विकास जायफळे हा नवा अवतार सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे यांच्यासोबत एक सेलिब्रिटी गेस्ट देखील असतो जो या व्हिडीओजमधून सर्वात उत्तम व्हिडीओ सादर करणाऱ्या परफॉर्मरची निवड करतो.

या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहे. आता या विनोदवीराला इंप्रेस करण्यासाठी परफॉर्मर्सना देखील तितकेच तोड व्हिडीओज सादर करावे लागतील. या आठवड्यात डुप्लिकेट्स गाजवणार लाव रे तो व्हिडिओचा मंच. महाराष्ट्राचा विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे तसंच उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यांचे डुप्लिकेट्स व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. इतकंच नव्हे तर भाऊ कदम देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘लाव रे तो व्हिडिओ’