ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपल्या सगळ्यांची लाडकी ‘झी युवा’ वाहिनी, ‘डॉक्टर डॉन’ ही जबरदस्त मालिका आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘झी युवा’वर अवतरलेला हा डॉन, फारच इमोशनल आहे. विनोदी पद्धतीने एका डॉनचं आयुष्य या अप्रतिम मालिकेतून मांडण्यात आले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे मालिकेची रंगत अधिक वाढली आहे.देवदत्त आणि श्वेता या दोन्ही मुख्य कलाकारांच्या अभिनयाची आणखी एक खास झलक लवकरच पाहायला मिळणार आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन, थेट अलिबागला निघाले आहेत. सगळ्याच रस्त्यांवर ट्रॅफिक झाले असल्याने डॉनने समुद्रमार्गे अलिबाग गाठण्याचे ठरवले आहे. यात मोठी गम्मत आहे, ती म्हणजे मोनिका अर्थात, डॉनच्या डार्लिंगला समुद्राची वाटणारी भीती! मोनिकाला अलिबागला जायचे तर आहेच, पण समुद्रातून जाणं तिला फारसं आवडत नाहीये. डॉन आणि डीनचा रोमान्स, बोटीच्या प्रवासात मोनिकाची उडणारी धांदल आणि त्यातून घडणार असलेला गडबड, गोंधळ मालिकेत पाहायला मिळणार आहे. बोटीचा हा प्रवास एकदा पूर्ण झाला, की त्याची डार्लिंग नेहमी बोटीनेच प्रवास करेल याची डॉनला शंभर टक्के खात्री आहे. मोनिकाच्या मनातील समुद्राची भीती मात्र काही केल्या कमी होत नसल्याने, हा संपूर्ण प्रवास मजेदार ठरणार आहे.
‘या दोघांचा अलिबागपर्यंतचा प्रवास पूर्ण होणार का?’, ‘या प्रवासात नेमकं काय काय घडणार?’, ‘डीनची समुद्राची भीती कमी होणार का?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘डॉक्टर डॉन’च्या पुढील भागात मिळणार आहेत. या प्रवासाची गम्मत अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘डॉक्टर डॉन’ मालिकेचा पुढील भाग, रात्री ९ वाजता फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!!