मराठी चित्रपट म्हटलं, की ‘झी टॉकीज’ हे नाव आपसूकच आठवतं. दर्जेदार, भरपूर मनोरंजन करणारे, अनेक अप्रतिम मराठी चित्रपट या वाहिनीवर पाहायला मिळतात. म्हणूनच, ‘झी टॉकीज’ ही मराठी चित्रपटांसाठीची सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी आहे. जुन्या व नव्या चित्रपटांची मेजवानी ‘झी टॉकीज’ वर अनुभवायला मिळते. उत्तम मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर झी टॉकीजची निवड प्रेक्षक करतात. या वाहिनीवर, रविवार १५ मार्च रोजी, ‘गोल गोल गरा गरा‘ हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. स्त्रियांचा अत्यंत तिरस्कार करणाऱ्या दादा दांडेकर या व्यक्तीची आणि दादांच्या तीन मुलांची ही विनोदी कथा आहे. दांडेकरांच्या मनात स्त्रियांविषयी तिरस्कार असला, तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना हसवून लोटपोट करेल. त्यामुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या चित्रपटाला लाभणार आहे.

दादा दांडेकर स्त्रीवर्गाचा खूप तिरस्कार करतात. भाई, भाऊ आणि बाळ या आपल्या तिन्ही मुलांना सुद्धा त्यांनी याबाबतीत धाकात ठेवले आहे. वडिलांचा आदर करणारे हे तिघे भाऊ वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांनी दादा दांडेकर ही भूमिका उत्तम रंगवली आहे. अभिनेता सुशांत शेलार यानेही भाईची भूमिका उत्तमप्रकारे निभावली आहे. गिरीश ओक आणि उदय टिकेकर या कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी ‘झी टॉकीज’च्या ‘गोल गोल गरा गरा’ या सिनेमातून मिळणार आहे.

दांडेकरांच्या घरात स्त्रियांना प्रवेश नाही. कुटुंबप्रमुख असणाऱ्या दादांचं शेंडेफळ, अर्थात बाळ दांडेकर मात्र एका मुलीच्या प्रेमात पडतो. प्राचीवर मनापासून प्रेम करणारा बाळ आता त्याच्या प्रेमासाठी वडिलांच्या आणि दोन मोठ्या भावांच्या विरोधात उभा ठाकणार का? त्याला त्याचे प्रेम मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या रविवारी १५ तारखेला मिळतील. स्त्रीविरोधी दांडेकर घरातील ही विनोदी प्रेमकहाणी पाहायला विसरू नका, रविवारी १५ मार्चला, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी टॉकीज’वर!!!!