झी टॉकीज ही मराठी चित्रपटांसाठी सुप्रसिद्ध असलेली वाहिनी आहे. चित्रपटांच्या बरोबरीने, इतर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील झी टॉकीजवर प्रदर्शितहोतात. या कार्यक्रमांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. यातीलच एक कार्यक्रम म्हणजे ‘मन मंदिरा’ हा किर्तनावर आधारित कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातीलएका उत्तम लोककलेला, एक फार मोठे व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे. विविध कीर्तनकार इथे आपली कला सादर करतात. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचेमनोरंजन करणे व योग्य शिकवण देणे हा या कलाकारांचा मूळ उद्देश असतो. ‘कीर्तनकार’ हा शब्द ऐकल्यावर, एखादी बुजुर्ग, अनुभवी व्यक्ती डोळ्यासमोर येते.पण, या रविवारी, म्हणजेच ७ एप्रिल रोजी, ‘मन मंदिरा’च्या नव्या भागात, एका तरुण कीर्तनकाराने केलेले कीर्तन पाहायला मिळेल. यादिवशीच्या कीर्तनातील मुख्यकीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे वय अवघे २२ वर्षे आहे. कमी वयातच कीर्तनाची कला उत्तमप्रकारे हाताळून, त्यांनी नाव मिळवले आहे.

लहानपणापासूनच ज्ञानेश्वर पठाडे यांची देवावर खूप श्रद्धा होती. ही श्रद्धा व विश्वास यांच्या जोरावर त्यांची घडण झालेली आहे. गरीब घरात जन्माला येऊन सुद्धात्यांना देवभक्तीची शिकवण लहानपणीच मिळाली. एक दर्जेदार कीर्तनकार यातूनच घडला आहे. इतक्या कमी वयातच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा,गोवा, गुजरात अशा निरनिराळ्या राज्यांमधून त्यांनी कीर्तनाचे ५००० प्रयोग सादर केले आहेत. एक नामवंत कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या पठाडे यांच्याकिर्तनांमध्ये, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम या महान व्यक्तींच्या विचारांचा व शिकवणीचा समावेशअसतो. आपल्या कीर्तनातून, वृक्षारोपण, जलसंवर्धन, हुंडा प्रथा, अशा सध्याच्या ज्वलंत विषयांवर ते भाष्य करतात. याशिवाय, स्वच्छ भारत अभियान, स्त्री शिक्षण,अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयांचादेखील त्यांच्या किर्तनांमध्ये समावेश असतो.

लहान वयातच विविध विषय समर्थपणे हाताळू शकणाऱ्या या किर्तनकाराचे कीर्तन अत्यंत प्रेक्षणीय असते. हे कीर्तन पाहण्याची संधी झी टॉकीजच्या ‘मन मंदिरा’ याकार्यक्रमात मिळणार आहे. रविवारी, ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता या युवा किर्तनकाराचे कीर्तन पाहायला विसरू नका, आपल्या सर्वांच्या लाडक्या झीटॉकीजवर आणि झी टॉकीज HD वर.!!!