तरुणींचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता वैभव तत्ववादी, याने ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या भव्यदिव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे. अप्रतिम सूत्रसंचालनाबरोबर, त्याने आपल्या डान्सचा जलवा सुद्धा दाखवला. या हँडसम हंकच्या सोबतीने प्राजक्ता माळी, पल्लवी पाटील आणि शिवानी सुर्वे या तिन्ही ललनांनी सुद्धा आपल्या डान्सचा धमाका दाखवला. या चौघांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहताना, सर्व प्रेक्षक आणि सेलिब्रिटी मंडळींचे भरपूर मनोरंजन झाले. वैभवची तिघींसोबतची केमिस्ट्री जबरदस्त होती. यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सोहळ्यातील हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे.

दरवर्षीप्रमाणेच, यंदाही ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा भव्यदिव्य सोहळा तारेतारकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९’ या सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आपल्या डान्सचा जलवा असा दुहेरी धमाका वैभवने सादर केला. अशीच आणखीही भरपूर धमाल या मंचावर घडली आहे. असेच खास परफॉर्मन्स आणि हा रंगतदार सोहळा, येत्या रविवारी १२ तारखेला ‘झी टॉकीज’वर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका, तुमचे लाडके ‘झी टॉकीज’ रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता!!!