झी टॉकीज या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या या वाहिनीवर, यंदाचा गुढीपाडवा कौटुंबिक चित्रपटांची अनोखीमेजवानी घेऊन येणार आहे. शनिवार ६ एप्रिल रोजी, सकाळी ९ वाजल्यापासून हे चित्रपट पाहता येतील. दे धक्का, आम्ही सातपुते, हुप्पा हुय्या, माझा छकुला, नामदारमुख्यमंत्री गणप्या गावडे, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, या चित्रपटांचा यात समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येतील, असे हे चित्रपट पाहण्यात कुटुंबाचाछान विरंगुळा होणार आहे.
शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव असे उत्तम कलाकार असलेला ‘दे धक्का’ हा चित्रपट, धाकट्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेला एकाकुटुंबाचा एक प्रवास आहे. उत्तम दिग्दर्शन, सहजसुंदर अभिनय, विनोद निर्मिती अशा सगळ्याच बाजूंनी हा सिनेमा परिपूर्ण आहे. सात सख्खे भाऊ व त्यांना पसंतपडणाऱ्या सात सख्ख्या बहिणी, यांची प्रेमकहाणी रंगवणारा ‘आम्ही सातपुते’ हा चित्रपट यानंतर पाहता येईल. सुप्रिया व सचिन पिळगावकर व त्यांच्या सोबतीलाअशोक सराफ, यांच्या अभिनयाने ही विनोदी प्रेमकहाणी झकास रंगते. सिद्धार्थ जाधव याची मुख्य भूमिका असलेला ‘हुप्पा हुय्या’ हा चित्रपट सुद्धा या दिवशी पाहायलामिळेल. दैवी शक्ती प्राप्त झालेल्या एका प्रामाणिक व्यक्तीची ही कहाणी, छानसा सामाजिक संदेशदेखील देते. आदिनाथ कोठारे यांना बालकलाकार म्हणून पाहायचीसंधी देणारा, ‘माझा छकुला’ हा सिनेमादेखील या मेजवानीचा एक भाग असणार आहे.
राजकीय विषयांवर आधारित, विनोदनिर्मिती करून मनोरंजन करणारे व प्रसंगी डोळे उघडायला लावणारे ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ व ‘पुन्हा गोंधळ पुन्हामुजरा’ हे चित्रपट सुद्धा या यादीत समाविष्ट आहेत. अपघाताने मुख्यमंत्री झालेल्या गणप्याची कहाणी राजकारणातील चांगल्या-वाईट बाजूंवर प्रकाश टाकते. भरतजाधव यांनी ही भूमिका समर्थपणे पेलली आहे. सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ याचित्रपटातून मिळते. विविध राजकीय पैलूंवर हा चित्रपटदेखील भाष्य करतो. विनोदी मांडणीतून, राजकारण समजावून सांगणारा हा चित्रपट, कुटुंबाने नक्कीच एकत्रपाहायला हवा.
गुढीपाडव्याच्या दिवशी, झी टॉकीज उभारत असलेली, ही निराळी ‘चित्रपट गुढी’ पाहायला अजिबात विसरू नका; शनिवार ६ एप्रिल, सकाळी ९ वाजल्यापासून, फक्तआपल्या लाडक्या झी टॉकीजवर!!!