रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील व्यक्तिरेखांसोबतच त्यातील संवाद देखील खूप लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अण्णा आणि त्यांचा गोळीयो घालतालय हा डायलॉग प्रचंड गाजला आहे. पण अण्णा यावेळी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील गॅरी म्हणजेच गुरुनाथला गोळ्या घालणार आहेत. तसा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा फोटो नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१९ मधील आहे. अण्णा म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर आणि गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत आणि हा त्यांच्या सूत्रसंचालनाचाच भाग आहे. त्यामुळे हा मजेशीर प्रसंग पाहण्यासाठी पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड्स २०१९, रविवार २० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.